क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या आरोपपत्रात आर्यन खानला क्लीन चिट मिळाली आहे. त्याचवेळी आर्यन खान प्रकरणाचे तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे आता समीर वानखेडे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी NCB ने बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवर सापडलेल्या ड्रग्ज प्रकरणी क्लीन चिट दिली. या प्रकरणी केवळ 14 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, पुराव्याअभावी आर्यनसह 6 जणांची सुटका करण्यात आली आहे.
‘चुकीच्या पद्धतीने एखाद्या निष्पाप व्यक्तीला अडकविण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. याप्रकरणी ‘एनसीबी’चे तत्कालीन मुंबई प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.
याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील चिंचवडमध्ये याबद्दल बोलत होते. यावेळी बोलताना पुढे गृहमंत्री म्हणाले, ‘आर्यन खान याने अमली पदार्थ बाळगून त्याचे सेवन केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, सबळ पुराव्याअभावी त्याला न्यायालयाने निर्दोष सोडले. चुकीच्या पद्धतीने एखाद्या निष्पाप व्यक्तीला अडकविण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.’
दरम्यान, तर दुसरीकडे, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी योग्य तपास न केल्याने समीर वानखेडेवर कठोर कारवाईचे आदेश गृह मंत्रालयाने जारी केले आहेत. सरकारी सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले की, गृह मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी समीर वानखेडेची चौकशी सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
एनसीबीचे डीजी एसएन प्रधान यांच्या म्हणण्यानुसार, आर्यन खान ड्रग प्रकरणात समीर वानखेडेच्या टीमने चूक केली. अटकेवेळी समीर वानखेडे या प्रकरणाचा तपास करत होते. प्रधान यांच्या म्हणण्यानुसार, जर एनसीबीने चूक केली नसती तर एसआयटीने तपास स्वतःच्या हातात का घेतला असता.
याप्रकरणी एनसीबीच्या दक्षता पथकाचा अहवालही लवकरच येऊ शकतो, त्यानंतर समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. वानखेडे यांनी ज्या पद्धतीने प्रकरण हाताळले त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या. या प्रकरणी दक्षता पथक लवकरच अहवाल देऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या
वडिलांच्या फडणवीसांवरील गंभीर आरोपांनंतर संभाजीराजेंचाही गौप्यस्फोट; म्हणाले, शिवरायांना स्मरून सांगतो…
VIDEO: पार्टीत हॉटनेसचा तडका लावण्यासाठी आली जान्हवी कपूर, पण झाली oops moment ची शिकार
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींनी बी-ग्रेड चित्रपटात दिले आहेत खुपच बोल्ड सीन्स, यादीत कतरिनाचेही आहे नाव
…त्यामुळे सतीची प्रथा मुस्लिमांच्या अत्याचारामुळे सुरू झाली; मनसेने सांगितला इतिहास