राज्यात लाऊडस्पीकरच्या मुद्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशातच आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीवर भाजपने बहिष्कार घातला. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे बैठकीसाठी आपल्या पक्षाचे प्रतिनिधी पाठवले.
भोंग्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती दिली. भोंगे उतरवण्याच्या संदर्भात राज्य सरकारला कारवाई करता येत नसल्याचे त्यांनी म्हटले.
“कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्याचा भंग झाला तर आवश्यक ती कारवाई पोलिसांनी करणं आवश्यक आहे,” असं दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी सांगितलं. याचवेळी हा मुद्दा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असल्याची गुगली टाकून राज्य सरकारने भाजपची अडचण केली आहे.
याबाबत बोलताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, ‘सुप्रीम कोर्टाने २००५ मध्ये याबाबत निर्णय दिला होता. महाराष्ट्र सरकारने २०१५ ते २०१७ या कालावधीत काही शासन निर्णय काढले आहेत. त्यांच्या आधारे लाऊड स्पीकर लावण्याच्या संदर्भात सर्व स्पष्टता आहे, असे ते म्हणाले.
तसेच ‘हा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला असल्यामुळे तो संपूर्ण देशाला लागू आहे. त्यामुळे याबाबत केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेऊन तो लागू करावा. यामुळे प्रत्येक राज्यांत वेगवेगळी परिस्थिती राहणार नाही, असे वळसे पाटील म्हणाले.
दरम्यान, गावात जवळपास रोज भजनं, किर्तनं व विविध कार्यक्रम सुरू असतात. नवरात्रीचा उत्सव, गणेशोत्सव, गावाकडील यात्रा यावर काय परिणाम होतील, याबाबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. कायदा समाजासाठी समान आहे असं म्हणताना वेगवेगळ्या लोकांसाठी वेगळी भूमिका घेता येणार नाही,असं वळसे पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
राष्ट्रवादीची महीला नेता थेट मोदींच्या घरासमोर करणार हनुमान चालीसा पठण; वाद आणखी चिघळणार?
कॉमेडी आणि ससपेन्सने भरलेला असणार शेवटचा आठवडा, रिलीज होणार ‘हे’ चित्रपट आणि सिरीज
मारुतीपाठोपाठ टाटानेही दिला ग्राहकांना झटका, ‘एवढ्या’ रुपयांनी वाढवल्या गाड्यांच्या किंमती
बिग ब्रेकींग! सोमय्या हल्ला प्रकरणी शिवसेनेच्या माजी महापौरांसह ‘या’ तीन नगरसेवकांना अटक