Share

…अन् संतापलेल्या इंदुरीकरांना अखेर धनंजय मुंडेंचं ऐकावंच लागलं; परळीत भर किर्तनात झाला राडा

dhanjay munde
परळीत घडलेला एक प्रकार सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. परळीत नाथ प्रतिष्ठान आयोजित कीर्तनाच्या भर कार्यक्रमात, निवृत्ती महाराज इंदुरीकर कॅमेरा वाल्यांवर चांगलेच भडकले. चालू किर्तनादरम्यान, इंदुरीकर महाराजांनी  (Indurikar Maharaj) प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांना झापले.

सध्या या प्रकरणाची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. काही वेळ इंदुरीकर महाराज कॅमेरे बंद करा, या त्यांच्या मागणीवर ठाम होते. मात्र शेवटी राष्ट्रवादी – कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी माईक हाती घेत महाराजांना समजावण्याचा प्रयत्न केला अन् महाराजांना विश्वास देत कार्यक्रम सुरु करायला लावला.

वाचा नेमकं परळीत काय घडलं..?

देशभरात सर्वत्र बाप्पाच्या आगमानाने आनंदाचे वातावरण पसरले आहे. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी शहरात गणेशोत्वानिमित्त गेल्या ८ दिवसांपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं. गुरुवारी रात्री ‘गणेश फेस्टिवल’ची सांगता प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाने झाली.

मात्र तत्पूर्वी कीर्तन सुरु करतावेळीच इंदुरीकर महाराजांना मिडियाचे अनेक कॅमेरे दिसले. अन् बघता – बघता इंदुरीकर महाराज प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांवर भडकले. उतरा खाली आणि तो कॅमेरा काढून टाका..जिरवले तुम्ही आमचे..असं म्हणत इंदुरीकर महाराजांनी कॅमेऱ्यावरून संताप व्यक्त केला.

यावेळी बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले की, कीर्तनातलं मधलं कुठलंतरी एक वाक्य उचलायचं आणि त्यानंतर कीर्तनातलं दुसरं कुठलंतरी वाक्य कापायचं, ते एकमेकाशी जोडून फेसबुक, युट्युबवर अपलोड करायचं, याचे परिणाम आम्हाला भोगायला लागतात’.’

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी मध्यस्थी करत महाराजांना शांत केलं. “महाराज तुम्ही फेसबुक-यूट्यूबची काळजी करु नका… आपण विकत घेऊ.. त्याची जबाबदारी माझी.. ८ दिवसांपासून कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण झालं. आज जर नेमका इंदोरीकर महाराजांचाच कार्यक्रम प्रक्षेपित झाला नाही तर लोकांना प्रश्न पडेल, मलाही उत्तरं द्यावी लागतील”, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी महाराजांना कीर्तन सुरु करण्याची विनंती केली.

महत्त्वाच्या बातम्या
…तर आम्ही राज ठाकरेंनाच बाहेर काढू; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने स्पष्टच सांगीतलं
‘आम्हाला नाही, तर तुम्हालाही नाही’, शिंदे गटाने आखली वेगळीच रणनीती, उद्धव ठाकरेंसमोरील अडचणींमद्धे वाढ
पीएसआय भरती घोटाळ्यात भाजप आमदाराने घेतले पैसे; स्वत: कबुली देतं केला मोठा खुलासा, ऑडिओ क्लिप व्हायरल

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now