आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे, असा आरोप विरोधकांनी केला. यामुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापलं आहे.
तर दुसरीकडे पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच विधानसभेत शिंदे सरकारवर नामुष्की आली आहे. विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांना चांगलेच धारेवर धरले. यामुळे अधिवेशनाचा दूसरा दिवस चांगलाच गाजलेला पाहायला मिळाला. विरोधकांनी विधानसभेत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर प्रश्नांचा जोरदार भडिमार केला.
विरोधी पक्षनेते अजित पवारांनी तानाजी सावंत यांना चांगलेच लक्ष केले. अजित पवारांनी थेट पटलावर नसलेला प्रश्न विचारल्यामुळे नव्याने मंत्री झालेल्या तानाजी सावंत यांच्याकडे माहिती नव्हती आणि त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पवार यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत असमर्थ ठरले.
वाचा नेमकं घडलं काय?
त्याचं झालं असं, पालघर जिल्ह्यातल्या हत्तीरोग प्रादुर्भाव नियंत्रणासंदर्भात अजित पवार यांनी काही प्रश्न विचारले. मात्र अजितदादांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत असमर्थ ठरले. अखेर प्रश्न राखून ठेवावा लागला. अनेक प्रश्नावर माझ्याकडे आकडेवारी नाही, माहिती घेऊन सांगतो, असं सावंत यांनी सांगितलं.
दरम्यान, अजित पवारांनी विचारलेल्या प्रश्नाची माहिती सध्या सावंत यांच्याकडे नसल्याने त्यांना उत्तर देता आले नाही. म्हणून हा प्रश्न सध्या उत्तरासाठी सोमवारपर्यंत राखून ठेवण्यात आला. विशेष बाब म्हणजे, शिंद सरकारला विचारलेला पहिलाच प्रश्न राखून ठेवावा लागला आहे.
वाचा नेमकं अजितदादांनी सावंत यांना काय विचारलं?
पावसाळी अधिवेशनात पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाचा वाढता प्रादुर्भाव यावर सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, असा सवाल उपस्थित केला. यावर सावंत यांनी भाष्य केले. मात्र नंतर अजित पवारांनी पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या एकूण जागा, रिक्त जागा आणि भरलेल्या जागा याची माहिती द्या, असा सवाल विचारला असता त्यांना उत्तर देता आले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
अजितदादांनी तानाजी सावंतांना जागा दाखवली; विधानसभेत सावंतांच्या फजितीचीच चर्चा
पुन्हा नवा ट्विस्ट! भाच्याने केला खळबळजनक दावा; “…अन् तेव्हा विनायक मेटे कारमध्ये नव्हतेच”
Aditya Thackeray : भाजपमध्ये सुद्धा आहेत आदित्य ठाकरेंचे जबरा फॅन; थेट पुरावाच आला समोर
34 years of imprisonment : एक ट्विट पडले महागात; महिलेला ठोठावली तब्बल ३४ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा, वाचा पुर्ण प्रकरण…