shinde group : एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेत उभी फुट पाडली. शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत दोन गट पडले. याचे पडसाद आता राज्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. अनेक बड्या – बड्या नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरली. जवळच्या व्यक्तींनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडली.
यामुळे थेट याचा परिणाम पक्षावर झालेला पाहायला मिळत आहे. शिवसेनेला चांगलीच गळती लागल्याच पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या पाठोपाठ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी – कॉंग्रेसच्या नेत्यांनी देखील शिंदे गटाची वाट धरल्याने आता विरोधकांच्या गोटात देखील खळबळ उडल्याच पाहायला मिळत आहे.
शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचा बडा नेता देखील शिंदे गटात सामील झाल्याच वृत्त आता समोर आलं आहे. राष्ट्रवादीचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख सुरेष म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत येत युतीसरकारला पाठींबा दिल्याचे सांगितले आहे. यामुळे थेट राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना धक्का बसला असल्याचं बोलल जातं आहे.
म्हात्रे यांनी शिंदे गटाला समर्थन दिल असल्याच खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी काल भेट घेऊन युती सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला. म्हात्रे यांनी युती सरकारला पाठींबा देताच त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
म्हात्रे यांची भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून त्याबाबत नियुक्तीचे पत्र बाळ्यामामा यांना सुपूर्द करण्यात आले. म्हात्रे यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. यावर अद्याप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाहीये.
दरम्यान, काल दुपारी उरण मतदार संघाचे कार्यकर्ते उध्दव ठाकरेंना भेटायला गेले होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून पाठींबा असल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी काल रात्री अचानक बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे उद्धव ठाकरेंना जबर धक्का बसला असल्याचं बोललं जातं आहे.