राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीचे पुढं काय होणार? हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे. शिवसेनेणे भाजपशी युती तोडून राष्ट्रवादी – कॉंग्रेस आणि कॉंग्रेससोबत सरकार स्थापन केलं होतं. मात्र शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे ठाकरे सरकार अडीच वर्षात सत्तेतून बाहेर पडलं.
तेव्हापासून अजूनही राज्यात राजकीय घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीत बैठकांचे सत्र सुरू आहे. बडे – बडे नेते पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले आहेत. अशातच राष्ट्रवादी – कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक मोठं व्यक्तव्य केलं आहे. यामुळे आणखीच वातावरण तापलं आहे.
राज्यात शिंदे – फडणवीस आल्यामुळे आता महाविकास आघाडी एकत्र राहणार की विभक्त होणार? असा सवाल सध्या उपस्थित झाला आहे. अखेर आता खुद्द शरद पवारांनीच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीविषयी एक खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांच्या व्यक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
वाचा नेमकं शरद पवारांनी काय म्हंटलं आहे?
सध्या शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. जातीने राज्याच्या राजकारणात लक्ष घालत आहेत. याच पार्श्वभूमीवर सोमवारी ठाण्यात पवारांनी पदाधिकार आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी त्यांच्या राजकीय वाटचालीविषयी मोठं व्यक्तव्य केलं आहे.
मोरारजी देसाईंचं उदाहरण देत पवारांनी आपल्या वाटचालीबाबत व्यक्तव्य केलं आहे. पवारांनी म्हंटलं आहे की, “मी आता कोणत्याही प्रकारची सत्तेची जबाबदारी घेणार नाही. माझं वय ८२ आहे. मोरारजी देसाई भाग्यवान होते. ते ८२व्या वर्षी पंतप्रधान झाले. मोरारजींचा कित्ता मी काही चालवू इच्छित नाही”.
दरम्यान, राज्यातील आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार की वेगवेगळे लढणार? असा प्रश्न शरद पवारांना विचारला असता, ते म्हणले की, ‘आम्ही आगामी निवडणुकांना एकत्रपणे सामोरं जावं किंवा त्या स्वतंत्रपणे लढवाव्यात याविषयी चर्चा करत आहोत. आमच्या पक्षात त्यावर विचार सुरू आहे. पण निर्णय झालेला नाही.’
महत्त्वाच्या बातम्या
बंडखोर आमदार जयंत पाटलांच्या संपर्कात, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने सांगितली ‘अंदर की बात’
उद्धव ठाकरेंच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार म्हणणारे माजी खासदार शिंदे गटात सामील
Asia Cup: काय आहे जय शहा आणि तिरंगा वादाचे संपूर्ण सत्य? भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान असं काय घडलं?
PHOTO: २९ व्या वर्षी चित्रपटात पदार्पण, १७ वर्षात १० चित्रपट, आता ४६ व्या वर्षी केले बोल्ड फोटोशूट