Share

Ajit pawar : तेव्हा खूप बोलत होते आता एसटीचे सरकारमध्ये विलीणीकरण करण्यास कुणी रोखलय? अजित पवारांचा सवाल

devendra fadanvis ajit pawar

Ajit pawar angry on shinde fadanvis government | छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्ये, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न यांसारख्या अनेक मुद्यांवरुन राज्याचे राजकारण तापले आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेते अजित पवार सरकारवर टीका करताना दिसून येत आहे. आता अजित पवारांनी एका नव्या मुद्यावरुन राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

अजित पवार यांनी भाजप नेत्यांकडून केली जात असलेली वादग्रस्त विधाने, एसटी महामंडळाचे विलीनीकरण, शेतकऱ्यांचे प्रश्न यावरुन अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे. महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्यापासून सरकारला कोणी रोखले आहे? असा सवाल अजित पवारांनी केला आहे.

एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्यापासून आता यांना कोणी अडवले आहे? डंके की चोट पर करुँगा म्हणणारे आता शांत का आहे? शरद पवारांनी कधी कुणाचे घोडे मारले नाही. जुन्या जाणत्या व्यक्तीच्या घरावर हल्ला करता. घेतलेली ऍक्शन मागे घेतात. या राज्यात चाललं काय आहे? असे अजित पवारांनी म्हटले आहे.

तसेच मी सतत दुष्काळासाठी भांडलो. शेती मालाला हमीभाव दिला पाहिजे. बेरोजगारांकडे लक्ष दिले गेले पाहिजे. पण असे काही होताना दिसून येत नाही. जातिवादी लोकांना बाजूला ठेवता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

शिंदे-फडणवीस सरकार सीमावादावरील बोटचेपी भूमिका घेत आहे. एकही इंच जागा देणार नाही, असे शिंदे-फडणवीसांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना ठणकावून सांगायला हवे. खमकेपणाने काम करावे लागते. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत, अक्कलकोटवर दावा केला. मग तुम्ही बोलत का नाही? असे अजित पवारांनी म्हटले आहे.

तसेच भाजप नेते वादग्रस्त वक्तव्य करत आहे, त्यावरुनही अजित पवारांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात बेताल वक्तव्य करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पण त्यांना रोखले जात नाही. त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
solapur : जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या अतुलबाबत कोर्टाने दिला धक्कादायक आदेश; पोलिसांनाही झापले..
aparna tandle : पुण्याच्या ‘कामवाली बाई’चा युट्युबवर राडा, ३० कोटी लोकांनी व्हिडिओ पाहिला अन्…
vasant more : अखेर वसंत मोरेंच्या नाराजीचे खरे कारण आले समोर; म्हणाले माझ्या विरोधातील कट कारस्थान…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now