अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने म्हणजेच एनसीबीने सुशांत सिंह ची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीबाबत मोठा खुलासा केला आहे. सध्या एनसीबीने दिलेल्या माहितीमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केला आहे. रियाने गांजा खरेदी करून सुशांतला दिला असा एनसीबीने आरोप केला आहे. त्यामुळे आता रिया चक्रवर्तीच्याअडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यात रिया व अन्य दोन आरोपींवर एनसीबीनं गंभीर आरोप केले आहेत.
या प्रकरणात एनसीबीने मंगळवारी आरोपपत्राचा मसुदा सादर केला आहे. यात रियासह ज्या दोघांवर आरोप केले आहेत त्यांच्या आरोपनिश्चितीची प्रक्रिया होणार आहे. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील कथित ड्रग्ज वापराबाबत एनसीबीने तपास सुरु केला आहे.
रिया, तिचा भाऊ शौविक याच्यासह ३५ जणांवर हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. रिया चक्रवर्तीचे ड्रग्ज प्रकरण हे सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी जोडलेले आहे, असा दावाही एनसीबीने केला आहे. त्यामुळे या प्रकरणात रिया चक्रवर्तीसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
आरोपपत्रात दावा करण्यात आला आहे की, रिया आणि तिचा भाऊ शौविक यांनी इतर आरोपींकडून अनेकदा गांजा खरेदी करुन तो सुशांतला दिला होता. उच्चभ्रू सोसायटी आणि बॉलिवूडमध्ये अंमली पदार्थांचे वितरण, विक्री आणि खरेदी करण्यासाठी सर्व आरोपींनी मार्च २०२० ते डिसेंबर २०२० दरम्यान गुन्हेगारी कट रचला होता.
तसेच एनसीबीने म्हटलं आहे की, रियाने सुशांतच्या घराचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, घरातील कर्मचारी दीपेश सावंत आणि इतरांकडून गांजा खरेदी केला. आरोपींनी मुंबई तसेच आसपासच्या परिसरात अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी पैसे पुरवले होते. यात गांजा, चरस, कोकेन आणि इतर अंमली पदार्थांचा समावेश होता.
रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक अमली पदार्थ तस्करांच्या नियमित संपर्कात होता. ड्रग्जसाठी शौविकनेच रियाला पैसे देण्यास सांगितले. आरोपींवर कलम २७ आणि २७ अ, २८, २९ यासह एनडीपीएस कायद्यानुसार आरोप निश्चित करण्यात आले आहेत.