सध्या सर्वत्र दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘पुष्पा’ (Pushpa), ‘आरआरआर’ (RRR) नंतर आता ‘केजीएफ २’ (KGF 2) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिवसर धुमाकूळ घालत आहे. तर दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांचीही खूप पसंती मिळत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. यादरम्यान बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने मात्र या चित्रपटांबाबत वेगळं मत मांडलं आहे.
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना नवाजुद्दीनला विचारण्यात आले की, ‘कमर्शियल चित्रपटातील मुख्य पात्रांची संकल्पना बदलत आहे, असे तुम्हाला वाटते का?’ यावर उत्तर देताना नवाजुद्दीनने म्हटले की, ‘मला वाटत नाही की हे बदलत आहे. कारण मी ‘मंटो’ या चित्रपटातसुद्धा मुख्य भूमिका साकारली होती. पण हा चित्रपट पाहायला किती लोक आले?’
‘मला वाटलं होतं की, मागील दोन वर्षात लोकांनी जागतिक स्तरावरील चित्रपटसुद्धा पाहिले असतील आणि त्यांच्यामध्ये काही बदल झाला असेल. पण ज्याप्रकारचे चित्रपट आता हिट होत आहेत. यावरून असे वाटत आहे की, फक्त लोकांचे मनोरंजन केलं पाहिजे’.
https://www.instagram.com/p/CbKG_UUBFkE/
नवाजुद्दीनने पुढे म्हटले की, ‘असे बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांना प्रभावित करत असतात. यामध्ये विमान पाण्यावर चालतो आणि मासे हवेत उडतात. हा सर्व व्हिज्युअल अनुभव असतो. पण यामध्ये चित्रपट कुठे आहे? जेव्हा तुम्ही CODA आणि किंग रिचर्ड यासारखे चित्रपट ओटीटीवर पाहता तेव्हा चांगले चित्रपट पाहायला मिळत आहेत, यासाठी तुम्ही देवाचे आभार मानता’.
नवाजुद्दीने शेवटी म्हटले की, ‘ओटीटीने आम्हाला वाचवलं आहे. मला वाटतं की, मुलांना यासारखे अद्भुत चित्रपट आवडतात. यंग माइंड प्रगतीशील असतो. आणि आपल्याला दोन वर्षानंतर प्रगतीशील व्हायला हवं होतं. पण दुर्देवाने तसं झालं नाही’.
दरम्यान, नवाजुद्दीनच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास लवकरच तो ‘हीरोपंती -२’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात नवाज लैला नावाच्या खतरनाक डॉनची भूमिका साकारणार आहे. यामध्ये टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय नवाजुद्दीन ‘टीकू वेड्स शेरू’, ‘नूरानी चेहरा’ आणि ‘अफवाह’ यासारख्या चित्रपटातही दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
दिलेला शब्द कसा पाळायचा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं; आदेश बांदेकरांनी सांगितला आनंद दिघेंसोबतचा किस्सा
एकेकाळी स्टुडिओमध्ये उलटी साफ करायची ‘ही’ अभिनेत्री, आता KGF मध्ये साकारली महत्वाची भूमिका
Kabhi Eid Kabhi Diwali : ‘कभी ईद कभी दिवाली’मधून सलमानने अरशद आणि श्रेयसची केली हकालपट्टी? जाणून घ्या सत्य