Share

‘द काश्मीर फाईल्स’वर मोठे मोठे सेलिब्रिटी मौन असताना नवाजुद्दीन सिद्दीकीने दिली हटके प्रतिक्रिया

विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून अनेकांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता यावर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने देखील आपली वेगळी प्रतिक्रिया दिली आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट 1990 मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांवर आणि काश्मीर खोऱ्यातून त्यांचे पलायन यावर आधारित आहे. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनेक जण या चित्रपटाच्या समर्थनार्थ पुढे आले असतानाच एक वर्ग या चित्रपटाला विरोधही करत आहे. या चित्रपटाच्या मुद्द्यावरून बॉलिवूडही दोन गटात विभागले गेले आहे.

बॉलीवूडमधील सलमान खान आणि शाहरुख खानसारख्या सुपरस्टार्सनी या चित्रपटावर अजूनपर्यंत मौन पाळले आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना नवाजुद्दीन सिद्दीकीने या चित्रपटाबद्दल आपले मत मांडले आहे. याबाबत नवाजला विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, ‘मी अद्याप द काश्मीर फाईल्स चित्रपट बघितला नाही, पण मी लवकरच बघेन’

यावेळी नवाजुद्दीन सिद्दीकीला प्रश्न विचारण्यात आला की, हॉलिवूडमध्ये जास्तीत जास्त भारतीय कलाकारांनी काम करायला हवं असं तुम्हाला वाटतं का? यावर त्याने चाहत्यांना आवडेल असं उत्तर दिलं. म्हणाला, सतत आपण त्या सिनेमांमध्ये काम करावं, अशी आशा का बाळगायची?

त्यापेक्षा आपण चांगले सिनेमे करूयात जे तिकडं पाहिले जातील. त्यासाठी हिमतीची गरज आहे, जशी आता विवेक अग्निहोत्री यांनी ‘द काश्मीर फाईल्स’च्या माध्यमातून दाखवली आहे. तसे आणखी सिनेमे तयार व्हायला हवेत, असे म्हणत विवेक अग्निहोत्रींचं कौतुक केलं.

दिग्दर्शकाच्या दृष्टीकोनातून सिनेमा बनत असतो. त्याला त्यासाठी तेवढं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. मी अजून ‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा पाहिलेला नाही. पण अशा विषयांवर सिनेमे बनवले पाहिजेत. येत्या काळातही असे सिनेमे बनवले जावेत, अशी इच्छा यावेळी नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी व्यक्त केली.

बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now