Share

बॉलिवूडमधील वर्णभेदावर नवाजुद्दीन सिद्दीकी संतापला, म्हणाला, एखादी सावळी अभिनेत्री सांगा जी..

Nawazuddin Siddiqui

बॉलिवूडमध्ये घराणेशाही (Nepotism) आणि वर्णद्वेष (Racism) हे मुद्दे दीर्घकाळापासून चर्चेत आहेत. अनेकवेळा या विषयावरून वादही झाला. कंगना राणावतसारख्या काही सेलिब्रिटींनी यावर मोकळेपणाने आपलं मत मांडलं. तर काहींनी यावर प्रतिक्रिया न देणेच उचित समजलं. यादरम्यान अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने (Nawazuddin Siddiqui) या मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना नवाजुद्दीनने बॉलिवूडमध्ये घराणेशाहीसोबत वर्णभेदही अस्तित्वात असल्याचे म्हटले आहे.

एबीपी न्यूज मार्फत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान नवाजुद्दीनला बॉलिवूडमधील घराणेशाहीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बोलताना त्याने म्हटले की, ‘बॉलिवूडमध्ये घराणेशाही आहेच त्यासोबत वर्णभेदसुद्धा आहे. या दोन्ही गोष्टी म्हणजे बॉलिवूडमधील काळे सत्य आहे. मला एक अशी सावळी अभिनेत्री सांगा जी सुपरस्टार किंवा स्टार आहे. अभिनेता म्हणून तर मी आहेच. पण अभिनेत्रीचे नाव सांगा’.

नवाजुद्दीनने पुढे म्हटले की, ‘सावळे लोक चांगला अभिनय करू शकत नाहीत का? वर्णभेद हे आपल्या सोसायटीमध्ये आहे आणि इंडस्ट्रीतही आहे. आज मी माझ्या जिद्दीमुळे इथे आहे. माझ्यासारखी जिद्द अनेक अभिनेत्रींमध्ये आहे पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी तेवढ्याच ताकदीचं अभिनय कौशल्यही तुमच्यात असायला हवं’.

यावेळी नवाजुद्दीनला ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटासंबंधित प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा नवाजुद्दीनने म्हटले की, ‘मी अद्याप चित्रपट पाहिला नाही. पण मला वाटतं ते पाहावं आणि नक्की पाहणार’. पुढे नवाजुद्दीनला या चित्रपटाबाबत प्रश्न विचारण्यात आला की, ‘या चित्रपटामुळे बॉलिवूडमध्ये दोन गट पडले आहेत का?’ यावर उत्तर देताना त्याने म्हटले की, ‘मला माहित नाही’.

नवाजुद्दीनने म्हटले की, ‘चित्रपट बनवण्याबाबत प्रत्येक दिग्दर्शकाचा दृष्टिकोण वेगळा असतो. विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या दृष्टिकोणातून हा चित्रपट काढला. तसेच पुढेही प्रत्येक दिगदर्शक त्यांच्या दृष्टीकोणातूनच चित्रपट काढत असतात. पण जेव्हा ‘द काश्मीर फाईल्स’ यासारखे चित्रपट काढण्यात येतात तेव्हा नक्कीच तथ्य पडताळले जातात’.

महत्त्वाच्या बातम्या:
अभिनेत्री शिवानी रांगोळेने प्रियकर विराजसशी गुपचूप उरकलं लग्न? व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य आलं समोर
‘भाजपने ‘द काश्मीर फाइल्स’ ची फुकट तिकिटे वाटली तशीच पेट्रोल-डिझेलसाठी कुपन्स वाटली पाहिजेत’
ऑस्कर विजेत्या coda ने चोरली बॉलिवूड चित्रपटाची कथा? सलमान खानने केली होती ‘त्या’ चित्रपटात भूमिका 

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now