Share

गावातील मुलीवर फिदा झाला होता नवाजुद्दीन, पण टीव्हीने घातला घोटाळा; वाचा स्वतःच सांगितलेला किस्सा…

नवाजुद्दीन सिद्दीकीची (Nawazuddin Siddiqui) गणना आज बॉलिवूडमधील दमदार कलाकारांमध्ये केली जाते. पण आज तो जिथे आहे तिथे पोहोचायला त्याला बरीच वर्षे लागली. नवाजुद्दीन सिद्दीकीने 1999 मध्ये चित्रपटांमधील छोट्या भूमिकांद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या आगामी ‘हिरोपंती 2’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या आठवड्यात म्हणजे 29 एप्रिलला त्याचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. टायगर श्रॉफच्या या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत धमकावताना दिसणार आहे.(Nawazuddin had fallen in love with a girl in the village)

दरम्यान, त्याने त्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला आहे, जेव्हा तो त्याच्या गावी होता आणि अभिनेता होण्याचे स्वप्न पाहत होता. त्याने सांगितले की एक मुलगी होती जिच्याशी त्याला बोलायचे होते, परंतु त्या मुलीला टीव्हीमध्ये जास्त रस होता. त्यानंतर नवाजने त्या मुलीला वचन दिले आणि जे नंतर खरे करून दाखवले, परंतु ही गोष्ट त्या मुलीपर्यंत पोहोचली तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

नवाजुद्दीनने याआधी अनेकदा याचा उल्लेख केला आहे पण कधीही तपशीलात नाही. तो फक्त म्हणाला की त्याने एकदा एका मुलीला वचन दिले होते की तो एक दिवस टीव्हीवर येईल. मात्र नुकत्याच झालेल्या एका संवादात त्यांनी याबाबत सविस्तर खुलासा केला.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना, अभिनेत्याने खुलासा केला की, खरं तर जेव्हा आमच्या गावात टीव्ही आला तेव्हा ती कृषी दर्शन बघायला जायची. कधी कधी ती वाटेत आली की मी तिला माझ्याशी बोलायला सांगायचो. पण तिला कृषी दर्शन पाहायला जायचे असल्याने ती माझ्याशी बोलायची नाही म्हणूनच मी तिला म्हणालो, ‘एक दिवस मी टीव्हीवर येईल आणि तू बघशील’. इतकेच नाही तर नवाजुद्दीनने सांगितले की, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा टीव्ही मालिकेत काम केले तेव्हा त्यांनी एका मित्राला फोन करून सांगितले की, तो टीव्हीवर येत असल्याचे त्या मुलीला सांगा.

हा किस्सा आठवताना त्यांनी सांगितले की, मी मित्राला फोन केला आणि सांगितले की, उद्या रविवारी माझा कार्यक्रम येईल. तू तिला जाऊन सांग मी टीव्हीवर येणार आहे. तेव्हा माझा मित्र म्हणाला, ‘भाऊ, तिचे लग्न झाले आहे आणि तिला मुले आहेत. तिने ज्या पुरुषाशी लग्न केले आहे तो तिला टीव्ही पाहू देत नाही आणि घराबाहेर पडू देत नाही.

नवाजुद्दीन सिद्दीकी या आठवड्यात रिलीज होणाऱ्या ‘हिरोपंती 2’मध्ये दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकीने 1999 मध्ये आलेल्या सरफरोश या चित्रपटात छोट्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हळूहळू त्याने आपला ठसा उमटवला आहे. ब्लॅक फ्रायडे, कहानी, गँग्स ऑफ वासेपूर, द लंचबॉक्स, रमन राघव 2.0, बदलापूर, नो लँड्स मेन, मंटो, फोटोग्राफ यांसारख्या चित्रपटांमधून त्याने बरीच प्रशंसा मिळवली आहे.

महत्वाच्या बातम्या-
नवाजुद्दीन सिद्दीकीचा हटके अंदाज; लक्झरी कार सोडून केला लोकलने प्रवास, व्हिडिओ व्हायरल
या गोबऱ्या गालांच्या चिमुकलीला ओळखलंत का? नवाजुद्दीन सिद्दिकीसोबत पहिल्यांदाच झळकणार चित्रपटात
RRRआणि KGF 2 च्या यशावर नवाजुद्दीन सिद्दीकीची प्रतिक्रिया; म्हणाला, यात चित्रपट कुठंय?
नवाजुद्दीन सिद्दीकीला बदलायचंय बॉलिवूडचं नाव, म्हणाला, मला
या तीन गोष्टी मुळीच आवडत नाहीत  

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now