काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातून देशभरात कोरोना पसरवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असल्याचा आरोप केला. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावरुन राज्याच्या राजकारणात आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे.
याच मुद्यावरुन राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. ‘नमस्ते ट्रम्पच्या नावाखाली जगभरातून लोकांना अहमदाबादला बोलावण्यात आले. ट्रम्प यांना प्रोत्साहन दिले आणि तेथून देशभरात कोरोना पसरला, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे.
याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. ‘मजुरांसाठी तुम्ही ट्रेन चालवली आणि आम्ही तिकीट दिले. कारण तुम्हाला मजुरांकडून पैसे वसूल करायचे होते. मजूर चालत जात असताना त्यांची सर्व व्यवस्था आम्हीच केली. जेवण दिले, पाणी दिले आणि जाण्यासाठी तिकिटे दिली. तुम्ही फुकट ट्रेन चालवली नाही, असे मलिक म्हणाले.
दरम्यान, तुम्ही कोणताही विचार न करता लॉकडाऊन लावून लोकांना थाळया वाजवायला लावल्या. त्याचा परिणाम लोकं भोगत असल्याचे देखील नवाब मलिक म्हणाले. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे.
याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. ‘पंतप्रधांनी केलेल्या या आरोपांबद्दल सरकारमधील लोकांनी बोललं पाहिजे, मी काही त्यांच्यावतीने बोलण्याचा ठेका घेतलेला नाही असं यांनी म्हंटले आहे. राऊतांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
ते म्हणाले, ‘महाराष्ट्रासारख्या राज्यावर खापर फोडणं चुकीचं. जागतिक आरोग्य संघटनेनं धारावी पॅटर्नचं कौतुक केलंय. राज्यातील सरकार, मुंबई महापालिका कसं काम करतेय याचं दाखले, आदर्श सर्वोच्च न्यायालयाने इतर राज्यांना दिलेत,” अशी आठवण राऊत यांनी पंतप्रधान मोदींना करुन दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
रात्री गाडी चालवताना चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी, नाहीतर होऊ शकतो तुमचा अपघात
ब्रेकअप झाल्यानंतर बहुतेक मुली करतात ‘या’ गोष्टी, मुलांनाही माहिती असल्या पाहिजेत
लता मंगेशकरांनी आंबेडकरांची गाणी का गायली नाही? प्रकाश आंबेडकर म्हणाले…
लता मंगेशकरांच्या अंत्यसंस्काराला मराठी कलाकार का उपस्थित नव्हते? हेमांगी कवीने दिले स्पष्टीकरण