राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणींमद्धे वाढ होताना पाहायला मिळत आहे. आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. या अटकेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी – कॉंग्रेसचे नेते ईडी कार्यालयाबाहेर आक्रमक झाले आहेत.
ईडीने ही सकाळीच नवाब मलिक यांच्या घरी धडक दिली होती. ही बातमी बाहेर येताच राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर नवाब मलिक हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले. अखेर आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीने मोठी कारवाई केली आहे.
वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून चोवीस तासात कोर्टात हजर करण्यात येणार आहे. यावेळी ईडीकडून मलिकांची रिमांड घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती मिळत आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत.
दरम्यान, मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली.
तसेच याआधी अंडरवर्ल्डशी संबंधित इक्बाल कासकर तसेच अन्य काही व्यक्तींची चौकशी करण्यात आली होती. दाऊद इब्राहिमशी संबंधित काही व्यक्ती आणि खात्यांमधून मलिक यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे संबंध असल्याची माहिती सध्या मिळाली होती. दरम्यान, दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात मलिक यांचाही सहभाग असल्याचा पुरावे सापडले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
चेन्नई सुपर किंग्सच्या धडाकेबाज खेळाडूला दिल्ली कॅपिटल्सने पळवले, धोनीला मोठा धक्का
लग्नाला एक वर्ष होऊनही पतीने शारिरीक संबंध ठेवण्यास दिला नकार, पत्नीने उचलले धक्कादायक पाऊल
‘’भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला…’’
नशीबच पालटलं! एका रात्रीत ६० वर्षांचा मजूर झाला मॉडेल, स्टायलिश फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण