Share

bacchu kadu : बच्चू कडू सोंगाड्या असून ते तोडपाणी करतात; फडणवीसांच्या जवळच्या मित्राचे गंभीर आरोप

bacchu kadu : खासदार नवनीत राणा या गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आहेत. राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यातील वाद जगजाहीर आहे. असं असतानाच माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर आता नवनीत राणा यांनी जोरदार निशाणा साधला आहे. यामुळे अर्थातच नवीन वादाला तोंड फुटले आहे.

यामुळे आता राजकारण देखील चांगलंच तापलं आहे. अलीकडेच बच्चू कडूंनी कार्यकर्त्याला मारहार केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर अनेक स्तरातून बच्चू कडू यांच्यावर टीकेची झोड उठली होती. याचाच धागा पकडत राणा यांनी कडूंवर निशाणा साधला आहे.

माध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी म्हंटलं आहे की, बच्चू कडूंचे स्वत:वरचे नियंत्रण गेले आहे. त्यांनी स्वत:ला सांभाळायला पाहिजे. कार्यकर्त्यांना मारहाण, असं वागणं हा कार्यकर्त्यांचा अपमान आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान बच्चू कडू यांनी ठेवायला हवा.’

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, नेत्यांचा कार्यकर्त्यांप्रती असा व्यवहार चुकीचा व त्याचा अपमान करणारा आहे. बच्चू कडू सोंगाड्या असून ते तोडपाणी करतात, असं देखील नवनीत राणा यांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे. पुढे बोलताना नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला आहे.

त्या म्हणतात, ‘उद्धव ठाकरे हे एक अपरिपक्व राजकारणी आहेत. त्यांच्या राजकीय वक्तव्यावरुन ते परिपक्व आहे असे वाटत नाही. ते बाळासाहेबांचे सुपूत्र आहेत असंही वाटत नाही.’ तर दुसरीकडे आमदार बच्चू कडू यांनी देखील नवनीत राणा यांच्यावर जोरदार निशाणा साधत प्रत्युत्तर दिलं आहे.

अमरावतीत दिवाळी निमित्त खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे दाम्पत्य मोफत किराणा वाटत आहे, यावर बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याचं नाव न घेता टीका केली. ‘खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटणारे काही कमी नाही आहेत. तसंच महाठग आणि महा औलाद कमी आहे का? असा सवाल करत कडू यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली.

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now