राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १९ वयाची युवती मंगळवारी रात्री बेपत्ता झाली होती. खासदार नवनीत राणा यांनी मुलीच्या संदर्भाने लव्ह जिहादचा आरोप करत अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये काल राडा घातला. आता या प्रकरणाबाबत अशी माहिती समोर आली आहे, ज्यामुळे नवनीत राणा तोंडावर पडल्या आहेत.
मंगळवारी १९ वयाची युवती रात्री बेपत्ता झाली होती. त्यासंदर्भात तरुणीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनीही तरुणीचा शोध घेण्यासाठी तातडीने सूत्रे फिरवली. पण त्याचदरम्यान खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात काल या प्रकरणावरुन राडा घातला होता.
नवनीत राणा यांनी मुलीच्या संदर्भाने लव्ह जिहादचा आरोप करत अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये राडा घातला. मुलीला आत्ताच्या आता आमच्यासमोर हजर करा, म्हणत जवळपास २०मिनिटे त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. त्यानंतर, या साऱ्या कालच्या प्रकरणानंतर पोलिसांनी वेगाने सूत्रे फिरवत तरुणीचा शोध घेतला.
मात्र संबंधित तरुणीने काही कारणांना कंटाळून रागाच्या भरात घर सोडून गेले असल्याचं पोलिसांना सांगत नवनीत राणांना तोंडावर पाडलं. अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुलीचा जबाब वाचून दाखवला आहे.
झालं असं की, दोन दिवसांपूर्वी बँकेत जात असल्याचे सांगून घरातून बेपत्ता झालेली तरुणी बुधवारी रात्री साताऱ्यात सापडली. पुणे जीआरपी आणि सातारा पोलिसांनी मुलीला गोवा एक्स्प्रेसमधून ताब्यात घेतले. त्यानंतर,’लव्ह जिहाद’ साठी या तरुणीचे अपहरण करण्यात आलं होतं, असा सनसनाटी आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता.
एवढेच नाही तर, नवनीत राणा यांनी पोलिसांना ठणकावून हा लव्ह जिहादचाच प्रकार असल्याचं सांगितलं. पोलिसांनी चौकशी सुरु असल्याचं सांगत आम्हाला आणखी थोडा वेळ द्या, असं म्हटलं. मात्र नवनीत राणा काही केल्या ऐकायला तयार नव्हत्या.
नवनीत राणा यांनी संबंधित मुलीला आताच्या आत्ता आमच्यासमोर आणा, असं सांगत पोलिसांशी जवळपास २० मिनिटे हुज्जत घातली. मात्र आता तरुणीच्या जबाबानंतर नवनीत राणा या चांगल्याच तोंडघशी पडल्याची अमरावतीसह राज्यभर चर्चा आहे.