सध्या महाराष्ट्रात राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यातील वाद वाढत चालला आहे. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांची तुरंगातून सुटका झाल्यानंतर आज ते दिल्लीसाठी रवाना होत आहेत. दरम्यान, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केला.
राणा दाम्पत्यानी दिल्लीला रवाना होण्याआधी पत्रकारांशी संवाद साधला म्हणाले, तुरुंगात आम्हाला एखाद्या गुन्हेगारापेक्षाही वाईट वागणूक दिली. त्यामुळे या विरोधात आम्ही दिल्लीला जाणार आहोत, आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे, असे रवी राणा पत्रकारांना बोलताना म्हणाले.
तसेच म्हणाले, एका महिला खासदाराला पुर्ण पोलीस विभागाचा दुरुपयोग करुन अत्यंत वाईट वागणूक दिली गेली. राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत वाईट, द्वेषी, खुन्नस असे मुख्यमंत्री आहेत. आज त्यांनी बीएमसीला माझ्या फ्लॅटची पाहणी करायला पाठवलं आहे, असे म्हणाले.
तसेच संतापून म्हणाले, आपणही आता ऑनलाईन माझ्या फ्लॅटची पाहणी करा. सोबत खासदार संजय राऊत आणि अनिल परब यांनाही पाठवा ते रिकामेच बसलेले आहेत, असा टोला त्यांनी यावेळी राज्य सरकारला लगावला आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री यांच्यावर देखील निशाणा साधला.
रवी राणा म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आम्ही खार पोलीस स्टेशनमध्ये चहा प्यायलो, हो जरूर चहा प्यायलो. पण तो चहा आमच्या वकिलांसह आम्हाला दिला गेला. आम्हाला सांगण्यात आलं की, तुम्हाला बेल देत आहोत. त्यानंतर साडेबारानंतर आम्हाला सांताक्रूझच्या पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं.
रात्री साडेबारानंतर नवनीत राणांना त्रास दिला. सकाळी साडेपाचपर्यंत आम्हाला पाणी आणि सतरंजी देण्यात आली नाही. नवनीत राणांना पहाटेपर्यंत उभं रहावं लागलं. या सर्व घटनेचे सीसीटीव्ही फुटेज अजित पवार यांनी पाहावं. आम्हाला झालेल्या त्रासाबाबद्दल आम्ही दिल्लीत जाणार आहोत. देशाचे गृहमंत्री अमित शहा, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांना भेटणार आहोत, असे रवी राणा म्हणाले.