Share

नशिब MRI मशीनच्या आत जाऊन फोटो नाही काढला…; MRI चे फोटो व्हायरल केल्याने राणा ट्रोल

navnit rana

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील निवासस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाचण्याची घोषणा करणाऱ्या खासदार नवनीत राणा आता तुरुंगाबाहेर आल्या आहेत. पण नवनीत राणा यांची सुटका झाल्यापासून त्या आजारी आहेत. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी मानेसह शरीराच्या अनेक भागांच्या वेदनांसोबतच स्पॉन्डिलायटीसची तक्रार केली आहे.

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांचा एमआरआय स्कॅन करण्यात आला आहे. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात एमआरआय स्कॅन करण्यात आला. नवनीत राणा सध्या स्पॉन्डिलायसिस या आजाराने त्रस्त आहेत. तसेच डॉक्टरांनी फुल बॉडी चेकअपही केलं आहे.

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा हे तब्बल 13 दिवस तुरुंगात होते. तुरुंगातून सुटका होताच नवनीत राणा यांना वैद्यकीय तपासणीसाठी लीलावती रुग्णालयात आणण्यात आलं. त्यानंतर नवनीत राणा यांच्या ऑफिसने एमआरआय करते वेळचे फोटो सोशल मिडियावर टाकले.

काही वेळातच नवनीत राणा यांचे फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले. मात्र आता नवनीत राणा यांना aट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. तर दुसरीकडे फोटो काढण्याची परवानगी दिल्याने लिलावती हॉस्पिटल प्रशासनाला देखील टीकेचे धनी व्हावे लागले आहे.

युजर्सनी लिलावती हॉस्पिटल लॅबच्या आतमध्ये फोटो काढण्यासाठी माध्यमांना परवानगी देते का? असा संतप्त सवाल विचारला आहे. तसेच तर एका युजरने तर एमआरआय मशिनच्या आतमध्ये देखील कॅमेऱ्यावरुन फोटो काढण्यासाठी परवानगी मागितली आहे. सध्या सोशल मिडियावर राणा चांगल्याच ट्रोल होतं आहे.

दरम्यान, नवनीत राणा यांच्या स्पॉन्डिलायसिस आजाराची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, ‘एक सामान्य आजार आहे, एक प्रकारे याला गठिया रोग असे म्हणतात.’ अँकिलोझिंग स्पॉडिलोसिस (एएस) हा सांध्यांना सूज आल्यामुळे जडणारा एक वातविकार आहे, जो प्रामुख्याने पाठीच्या मणक्यावर आणि सॅक्रॉइलिक जॉइंट्स म्हणजे आपला मणका जिथे पेल्व्हिसशी जोडला जातो त्या भागावर परिणाम करतो.

या आजारामुळे कंबरेपासून वेदना सुरु होते. सोबतच पाठ आणि मानेमध्ये जडपणा जाणवतो. तसेच शरीराच्या बहुतांश भागात देखील वेदना होतात. यामुळे मणक्यातील जडपणा राहतो. धक्कादायक बाब म्हणजे काहीवेळा रुग्णांना एवढ्या जास्त वेदना होतात की शस्त्रक्रिया देखील करावी लागते.

महत्त्वाच्या बातम्या
१०० सिगरेट, ३० कप कॉफी, झोपेचा काहीच पत्ता नाही, ‘असे’ शाहरूख खानचे वैयक्तिक आयुष्य
पालकांनो लक्ष द्या! मुलांची IQ पातळी वाढवण्यासाठी करा ‘या’ गोष्टी, स्वत: तज्ञांनी दिलाय सल्ला
..त्यामुळे माझी वास घेण्याची क्षमता केली होती, लॉकअपमध्ये पुनम पांडेचा धक्कादायक खुलासा
११ व्या वर्षी सुरू केली ऍक्टिंग; पती, मुलांना सोडून प्रियकरासोबत पळाली विदेशात, नंतर रस्त्यावर घालवले जीवन

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now