Share

‘मला तो व्हिडिओ द्या’, नवनीत राणांना डिस्चार्ज मिळताच किशोरी पेडणेकर थेट लिलावतीत

kishori

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील निवासस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाचण्याची घोषणा करणाऱ्या खासदार नवनीत राणा आता तुरुंगाबाहेर आल्या आहेत. पण नवनीत राणा यांची सुटका झाल्यापासून त्या आजारी आहेत. नवनीत राणा (MP Navneet Rana) यांचा एमआरआय स्कॅन करण्यात आला आहे.

मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात एमआरआय स्कॅन करण्यात आला. त्यांचा MRI मशीनमधला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हे फोटो व्हायरल होताच नवनीत राणा मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील झाल्या. तर आता या फोटोंवरून शिवसेना देखील आक्रमक झाली आहे.

या फोटोंवरून शिवसेनेने लिलावती रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला आहे. शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर आणि मनिषा कायंदे यांनी लिलावती रुग्णालयाला धारेवर धरलं आहे. एवढंच नाही तर राणांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी थेट लीलावती रुग्णालया भेट दिली.

शिवसेनेने रुग्णालय प्रशासनाला काही संतप्त सवाल उपस्थित केले आहे. ‘राणांना रुग्णालयात शूटिंगची परवानगी कशी देण्यात आली? असा सवाल पेडणेकरांनी उपस्थित केला आहे. याबाबत बोलताना पेडणेकरांनी म्हंटलं आहे की, स्पाँडिलायसिस असताना नवनीत राणांनी उशी कशी काय वापरली?.’

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘नवनीत राणांचा MRI नक्की झाला की नाही? झाला असेल तर रुग्णालय प्रशासनाने त्याला अहवाल सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली. MRI रुममध्ये रुग्णासोबत एकाच व्यक्तीला परवानगी असताना राणांसोबत चार लोक कसे गेले. सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडीओ मला द्या, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, काही वेळातच नवनीत राणा यांचे MRI फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले. मात्र आता नवनीत राणा यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. तर दुसरीकडे फोटो काढण्याची परवानगी दिल्याने लिलावती हॉस्पिटल प्रशासनाला देखील टीकेचे धनी व्हावे लागले.

युजर्सनी लिलावती हॉस्पिटल लॅबच्या आतमध्ये फोटो काढण्यासाठी माध्यमांना परवानगी देते का? असा संतप्त सवाल विचारला आहे. तसेच तर एका युजरने तर एमआरआय मशिनच्या आतमध्ये देखील कॅमेऱ्यावरुन फोटो काढण्यासाठी परवानगी मागितली आहे. सध्या सोशल मिडियावर राणा चांगल्याच ट्रोल होतं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
…तर राहुल द्रविड आणि रोहित शर्माने राजीनामा द्यावा, दिनेश कार्तिकसाठी चाहते मैदानात
चेन्नईच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा कायम, दिल्ली विरुद्धच्या विजयानंतर जाणून घ्या समीकरण
खरंच पंतप्रधानांच्या प्लेनमध्ये स्विमिंग पूल आहे का? जाणून घ्या अधीर रंजन यांच्या दाव्यामागचे सत्य
यशोगाथा: मुलांनी आईची माया पोहोचवली घराघरात, ‘अम्मा की थाली’ देशात नाही तर जगात प्रसिद्ध

 

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now