Share

‘हे फोटो कोणत्या बागेत काढलेत?’, शिवसेना नेत्यांचे फोटो ट्विट करत भाजपचा संतप्त सवाल

bjp

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील निवासस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाचण्याची घोषणा करणाऱ्या खासदार नवनीत राणा आता तुरुंगाबाहेर आल्या आहेत. मात्र त्यांच्या अडचणी काही केल्या कमी होण्याच नाव घेत नाहीये. अशातच मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात एमआरआय स्कॅन करण्यात आला.

त्यांचा MRI मशीनमधला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हे फोटो व्हायरल होताच नवनीत राणा मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील झाल्या. तर आता या फोटोंवरून शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. या फोटोंवरून शिवसेनेने लिलावती रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला आहे.

शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर आणि मनिषा कायंदे यांनी लिलावती रुग्णालयाला धारेवर धरलं आहे. एवढंच नाही तर राणांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी थेट लीलावती रुग्णालया भेट दिली. शिवसेनेने रुग्णालय प्रशासनाला काही संतप्त सवाल उपस्थित केले आहे.

तर आता भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार राम सातपुते यांनी शिवसेना नेत्यांचे फोटो ट्विट करुन सवाल उपस्थित केला आहे. आमदार सातपुते यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि मंत्री एकनाथ शिंदे यांचे लीलावती रुग्णालयातले फोटो शेअर केले आहेत.

https://twitter.com/RamVSatpute/status/1523625252265156608?s=20&t=Ls5CnP18TsZsto3DSDHe8w

सातपुते यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, ‘शिवसेनेने हॉस्पिटलमधल्या फोटोवर बोलण्याअगोदर हे फोटो zoom करून बघून सांगाव, ते कोणत्या बगीचामध्ये काढले आहेत?, असा खोचक सवाल सातपुते यांनी विचारला आहे. यावर अद्याप शिवसेना नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या नाहीये.

दरम्यान, काही वेळातच नवनीत राणा यांचे MRI फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले. मात्र आता नवनीत राणा यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. तर दुसरीकडे फोटो काढण्याची परवानगी दिल्याने लिलावती हॉस्पिटल प्रशासनाला देखील टीकेचे धनी व्हावे लागले.

राणांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी थेट लीलावती रुग्णालया भेट दिली. शिवसेनेने रुग्णालय प्रशासनाला काही संतप्त सवाल उपस्थित केले आहे. त्या म्हणाल्या, ‘राणांना रुग्णालयात शूटिंगची परवानगी कशी देण्यात आली? असा सवाल पेडणेकरांनी उपस्थित केला आहे. याबाबत बोलताना पेडणेकरांनी म्हंटलं आहे की, स्पाँडिलायसिस असताना नवनीत राणांनी उशी कशी काय वापरली?.’

महत्त्वाच्या बातम्या
सत्ता डोक्यात जाते, तेव्हा जनताच एक दिवस ती नशा मतपेटीतून उतरवते; चित्रा वाघ किशोरी पेडणेकरांवर भडकल्या
आमिर खानच्या मुलीने बिकीनीवरच साजरा आपला वाढदिवस; बोल्ड फोटो पाहून लोकं म्हणाले..
अयोध्येत लता मंगेशकर यांच्या नावाने बांधणार चौक; मुख्यमंत्री योगींनी केली मोठी घोषणा
राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या भाजप खासदाराला महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा पाठिंबा; फोन केला अन्…

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now