Share

डिस्चार्ज मिळताच नवनीत राणा पुन्हा कडाडल्या; माझ्याविरोधात जिंकून दाखवा, मुख्यमंत्र्यांना दिलं थेट आव्हान

navnit rana

‘उद्धव ठाकरेंना माझे आव्हान आहे की त्यांनी माझ्याविरोधात कुठेही निवडणूक लढवून दाखवावी आणि जिंकून दाखवावे,’ असे खुलं आव्हान खासदार नवनीत राणा यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले आहे. यामुळे राणा विरुद्ध शिवसेना यांच्यातील वाद आणखीच वाढणार असल्याच बोललं जातं आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हटल्याप्रकरणी राणा दाम्पत्याची तब्बल 12 दिवसांनी तुरुंगातून जामिनावर सुटका झाली आहे. तर दुसरीकडे नवनीत राणा यांना स्पॉडेलायटिसचा त्रास होऊ लागला. त्रास होऊ लागल्याने नवनीत राणा यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आलं होतं.
अखेर नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला. यावेळी बोलताना नवनीत राणा यांनी मुंबई निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.

मुख्यमंत्री ठाकरेंना ओपेन चॅलेंज करत त्या म्हणाल्या, ‘जनतेसमोर येऊन तुम्ही निवडणूक लढवून दाखवा. महिलेची ताकद काय आहे हे मी दाखवून देईन. उद्धव ठाकरेंनी माझ्याविरोधात निवडून येऊन दाखवावे. उद्धव ठाकरेंनी कोणताही  मतदारसंघ निवडावा, त्यांच्याविरोधात मी उभी राहणार आहे.’

दरम्यान, येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत मी पूर्ण ताकदीने लढा देणार आहे, असे नवनीत राणा यांनी ठणकावून सांगितलं आहे. मी मुंबईची मुलगी आहे. मुंबईत दोन पिढ्यांपासून सत्ता आहे त्यांच्याविरोधात मी येत्या महापालिका निवडणुकीमध्ये प्रचार करणार असल्याच देखील त्यांनी सांगितलं.

तसेच रवी राणा यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली. ‘राऊत चवन्नीछाप आहेत. राऊत कोर्टाच्या निर्णयावरही टीका करतात,’ असं रवी राणा यांनी म्हंटलं आहे. रवी राणा म्हणाले, ‘कोर्टाने जो निर्णय दिला त्याचे आम्ही पालन करणार आहोत. राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा असल्याचे कोर्टाने सांगितल्यानंतरही त्यावर आक्षेप घेण्याचे काम राऊत यांनी केले. ते ’20 फूट खोल गाडण्याची धमकी आम्हाला देतात, त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. मात्र हनुमानाचे नाव घेतल्यावर आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो हे दुर्दैव आहे,”

महत्त्वाच्या बातम्या
४-५ वर्षांपासून प्रयत्न करत होती, मुल होत नाही म्हणून नवऱ्याला…; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
…तर मी १४ दिवस काय १४ वर्षे पण तुरुंगात राहायला तयार आहे; नवनीत राणा मुख्यमंत्र्यांवर भडकल्या
IPL 2022: आशिष नेहराचे लज्जास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद; आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन…
संजय राऊत हा चवन्नी छाप माणूस, ते कोर्टाच्या निर्णयावरही टीका करतात; रवी राणा भडकले

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now