गेल्या काही दिवसांपासून युक्रेन(Ukren) आणि रशिया(Russia) या देशांमध्ये भयंकर युद्ध सुरु आहे. सोमवारी रशियाने युक्रेनमधील खार्किव शहरावर हवाई हल्ला केला होता. या हवाई हल्ल्यात नवीन शेखरप्पा नावाच्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. नवीन हा खार्किव्ह नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाला शिकत होता.(navin father statement on government)
नवीनच्या निधनाची बातमी कळताच त्याच्या वडिलांना अश्रू अनावर झाले होते. या दरम्यान केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी युक्रेनमधील मेडिकल शिक्षणाबाबत वक्तव्य केलं आहे. “युक्रेन किंवा विदेशात मेडिकल शिक्षणासाठी जाणारे ९० टक्के विद्यार्थी आपल्या देशातील परीक्षेत क्वालिफाय देखील होऊ शकत नाहीत”, असं विधान केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं आहे.
या वक्तव्यामुळे प्रल्हाद जोशी यांच्यावर देशभरातून टीका केली जात आहे. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नवीनचे वडिल प्रल्हाद जोशींनी केलेल्या वक्तव्यावर व्यक्त झाले होते. “माझ्या मुलाला बारावीमध्ये ९७ टक्के मिळाले होते, तरीही त्याला भारतात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला नाही”, अशी खंत नवीन शेखरप्पाच्या वडिलांनी व्यक्त केली होती.
प्रसारमाध्यमांशी बोलताना नवीनचे वडील म्हणाले की, “बारावीला ९७ टक्के मिळून देखील माझ्या मुलाला राज्यात मेडिकलची सीट मिळू शकली नाही. इथं मेडिकलची सीट मिळवण्यासाठी कोट्यवधी रुपये द्यावे लागतात. विदेशात भारतापेक्षा कमी पैशात वैद्यकीय शिक्षण मिळत आहे.” यावेळी नवीनच्या वडिलांनी आपल्या भावना प्रसारमाध्यमांसमोर मांडल्या.
युक्रेनमध्ये जवळपास २० हजार भारतीय अडकले आहेत. यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. या विद्यार्थ्यांना भारतात वेळीच परत आणण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे, अशी टीका देशभरातून केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भारतीय विद्यार्थी संतापले आहेत.
नवीनला बारावीला ९७ टक्के होते तरी देखील त्याला भारतात मेडिकलची सीट मिळाली नव्हती. मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी त्याला युक्रेनला जावं लागलं होत. रशियाने युक्रेनमधील खार्किवमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात नवीन शेखरप्पा या भारतीय विद्यार्थ्यांचा सोमवारी मृत्यू झाला होता. नवीन काही सामान आणण्यासाठी घराबाहेर पडलं होता, त्यावेळी हा हल्ला झाला.
महत्वाच्या बातम्या :-
रशियाने युक्रेनवर हल्ला करताच अंबानी-अडानींचे बुडाले तब्बल ८८ हजार कोटी, वाचा नेमकं काय घडलं..
शेतकऱ्याचा नाद नाय! बुलेटपासून फक्त ‘एवढ्या’ रुपयांत बनवला ट्रॅक्टर, आता १४० शेतकऱ्यांनी केला खरेदी
रशियाच्या हल्ल्यात मृत्यु झालेल्या नवीनचा वडीलांसोबतचा शेवटचा व्हिडीओ कॉल आला समोर, पाहून अश्रू अनावर होतील