राष्ट्रीय पुरस्कार विजेती मराठमोळी अभिनेत्री उषा जाधव (National Award Winner Usha Jadhav )युरोपियन सिनेसृष्टीत प्रभावी काम करून आपली एक ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयाद्वारे लोकांचे मन जिंकण्यासोबतच ती इतर वेगवेगळ्या सृजनात्मक कामाद्वारेही लोकांवर आपला प्रभाव टाकत आहे. यादरम्यान आता पुन्हा एकदा उषाने तिच्या एका कामगिरीद्वारे जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावले आहे.
नुकतीच स्पेनमधील चित्रपट आणि टीव्ही माध्यमात काम करणाऱ्या प्रभावी अभिनेत्रींसोबत एका चर्चासत्राचे आजोयन करण्यात आले होते. स्पेनच्या क्रिडा आणि संस्कृती मंत्रालयाच्या सहयोगाने स्पॅनिश असोसिएशन ऑफ वुमन इन फिल्म्स अँड टीव्ही आणि Cima व कूफिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात उषा जाधवला प्रमुख मान्यवर अतिथी म्हणून बोलवण्यात आले. तिने यामध्ये Essential Voices या कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमात उषाची गणना जागतिक चित्रपटांवर आपल्या बोलण्याने प्रभाव टाकणाऱ्या अभिनेत्रींमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे तिला या चर्चासत्रात बोलावण्यात आले. उषाने या कार्यक्रमाच्या माध्यमातून केवळ भारताचे नाही तर संपूर्ण आशिया खंडांचे प्रतिनिधित्व केलं आहे.
या चर्चासत्रात माध्यम आणि तंत्रज्ञान यांच्यात होणारा बदल, त्यावरील उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. तसेच दृकश्राव्य माध्यमातील विविध गोष्टींना प्रोत्साहन कसे देता येईल, यावरही या चर्चासत्रात मंथन करण्यात आले. उषासोबत या चर्चासत्रात आफ्रीका, युरोप आणि लॅटिन अमेरिकेतील कलाकारही सहभागी झाले होते.
यासंदर्भात अमर उजालाशी बोलताना उषाने सांगितले की, कोरोना महामारीच्या काळात तिला स्पेनमध्ये काम करण्याच्या अनेक ऑफर मिळाल्या. त्याचा तिने लाभ घेतला. त्यानुसार तिथे पोहोचल्यानंतर उषाला कळाले की, मानवतेच्या भाषेला कुठल्याही प्रकारची बंधनं नसतात.
भारतातही विविध भाषांमधील चित्रपटांसाठी दीर्घकाळापासून सुरु असलेली भाषांची बंधने संपुष्टात येत असल्याने, उषाने यावेळी तिचा आनंद व्यक्त केला. उषाच्या म्हणण्यानुसार, भारतीय चित्रपटाला जागतिक स्तरावर मोठा गौरव आहे. परंतु, आता गरज याची आहे की, भारतीय दिग्दर्शकांना त्या कथानकांपर्यंत पोहोचायचे ज्यापर्यंत अद्याप कोणी पोहोचू शकले नाहीत.
दरम्यान, उषाने युरोपीयन चित्रपटांमध्ये तिची ओळख निर्माण केली असली तरी ती आपल्या भारतीय चित्रपटाला विसरली नाही. तिने म्हटले की, ती लवकरात लवकर भारतात येऊ इच्छित आहे. स्पेनमधील काम संपताच ती लवकरच मायदेशात परतणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
रवीना टंडनने ज्या लहान मुलाला सेटवरून हाकलून लावले तोच आता बॉलिवूडवर करतोय राज्य
सलमानने विशाल कोटियनच्या गर्लफ्रेंडला केले किस, अशी होती होती बॉयफ्रेंड विशालची प्रतिक्रिया
लतादीदींच्या वडिलांच्या पिंडाला शिवत नव्हता कावळा, तेव्हा लतादीदींनी ‘ही’ प्रतिज्ञा घेतली अन् कावळा शिवला






