nashik : नाशिकमधून आणखी एक मोठी दुर्घटना घडल्याची बातमी समोर येतं आहे. आज पहाटेच एका बसने पेट घेतल्याची माहिती समोर आली होती. या भीषण अपघातात अनेकांनी आपले जीव गमावले. हि घटना ताजी असतानाच आणखी एक घटना घडल्याने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या वणी गडावर जात असताना एका प्रवासी बसला अचानक आग लागली आहे. या घटनेने पुन्हा एकदा नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. असं असलं तरी देखील सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. ही बस नांदुरीहून वणी गडावर जात होती.
सुदैवाची बाब म्हणजे बसमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. या अपघाताबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, आज नाशिकमधील कळवण तालुक्यातील श्री सप्तशृंगी गड येथे ग्रामपंचायतीच्या टोलनाक्याच्या जवळ महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसला आग लागल्याची घटना घडली.
तसेच ही एसटी बस पिंपळगाव बसवंत डेपोची होती. नांदुरीहून वनी गडावर ही बस जात होती. आग लागल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखून चालक आणि वाहक यांनी तत्काळ बसमधून उड्या मारल्याने सर्वांचे जीव वाचले. बसला आग लागल्याचं समजताच स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.
वाचा पहाटे घडलेल्या अपघाबद्दल अधिक माहिती..!
आज पहाटे लक्झरी बस आणि टँकरमध्ये झालेल्या भीषण अपघाताने मोठी दुर्घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातानंतर लक्झरी बसने पेट घेतला. यात सुमारे 13 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस आणि टँकर यांच्यात भीषण अपघात झाला.
दरम्यान, बस पेटल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आले, त्यांनी उड्या मारल्या तर ज्यांना उतरता आले नाही ते प्रवासी प्रवासी बसमध्ये जळून खाक झाले. या आगीत बसमधील जवळपास सात ते आठ प्रवासी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.






