Share

पोलीस चौकीत ‘झिंग झिंग झिंगाट’, रंगली ‘डर्टी पार्टी’; पोलिसांच्या अब्रूची लख्तरं वेशीवर..

crime nashik

पोलिसांच्या अब्रुची लक्तरं वेशीवर टांगण्यात आल्याची घटना नाशिकमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी अशाप्रकारे पोलिस चौकीतच दारू पार्टी रंगवून चौकीचा ‘बार’ बनविल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. मद्यपी पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय.. गंगापूर रोडवरील दादोजी कोंडदेव नगर परिसरातील पोलीस चौकीतच 5 पोलीस मद्यधुंग अवस्थेत पार्टी करीत असताना रंगे हात नागरिकांना सापडले आहेत. या घटनेचा व्हिडिओ देखील आता व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, पोलीस ऑन ड्युटी दारू पार्टी करत आहेत.

त्याचं झालं असं, टवाळखोरांची तक्रार देण्यासाठी जागरूक नागरिक गेला असता हा प्रकार उघडकीस आला. पोलीसांनी 55 ते 60वर्षीय नागरिकाला चौकीत घेऊन दरवाजा लावून घेत लाईट बंद करून बेदम मारहाण केल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. तसेच पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी देखील ते करत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही टवाळखोर तरुण दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घालत होते. टवाळखोर तरुणांच्या त्रासाला कंटाळून काही स्थानिक नागरिक तक्रार देण्यासाठी गंगापूर रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डी. के. नगर चौकीत आले होते.

यावेळी समोर पाहिलेले दृश्य पाहून नगरिकांच जबर धक्का बसला. ड्युटीवर असलेले पोलीसच मद्यधुंद अवस्थेत आढळले आहेत. संबंधित नागरिकांनी हा प्रकार आपल्या मोबाइलमध्ये रिकॉर्ड केला आहे. मात्र मद्यधुंद अवस्थेतील पोलिसांनी नागरिकांना धक्काबुक्की करत मारहाण केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

दरम्यान, यावेळी चौकीत 5 ते 6पोलीस कर्मचारी ओली पार्टीत ‘झिंगाट’ झालेले होते. त्यांनी त्यांना आतमध्ये बोलावून घेतले आणि लाईट बंद करून मारहाण केली, असे नागरिकांनी सांगितले. यावेळी एका मद्यपी पोलिसाने शिवीगाळ करत चौकीतून पळ काढल्याची देखील माहिती मिळत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
पक्ष, धोरण, निवडणुका, आमदारकी गेली खड्ड्यात, संभाजीनगरसाठी राजीनामाही देईन; मुनगंटीवार आक्रमक
सत्तेचा माज भोवला! भावजयीला बेदम मारहाण करणाऱ्या शिवसेना आमदाराविरोधात गुन्हा दाखल
भयानक! ‘या’ शहरात कोरोनाचा हाहाकार, सापडले तब्बल २७ हजार रुग्ण, मोडले सर्व रेकॉर्ड
गुजरात निवडणुकीत केला जाऊ शकतो भाजपचा पराभव; राहुल गांधींनी आखला मास्टर प्लॅन

इतर क्राईम ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now