narindar kaur wedding with party worker | पंजाबमधील संगरूरमधील आम आदमी पक्षाच्या आमदार नरिंदर कौर यांनी लग्नगाठ बांधली आहे. २८ वर्षीय नरिंदर यांनी लग्नाचा सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला आहे. त्यांनी पक्षाचे कार्यकर्ता मनदीप सिंग लाखेवाल यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.
पटियालाच्या रोडेवाल गावात असलेल्या गुरुद्वारा साहिबमध्ये हा लग्नाचा सोहळा पार पडला आहे. लग्नानंतर नरिंदर कौर यांनी पत्रकारांना सांगितले की, आम आदमी पक्षाने सामान्य कुटुंबातील उमेदवाराला निवडून आणून सरकार स्थापन केले आहे. त्यामुळेच एक सामान्य कुटुंब असल्याने आम्ही साधेपणाने लग्न केले आहे.
पुढे आमदार नरिंदर म्हणाल्या की, राजकीय जबाबदारीसोबतच आता कौटुंबिक जबाबदारीही वाढली आहे, पण ती वाटण्यासाठी जोडीदारही सापडला याचा आनंद आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नरिंदर कौर आणि मनदीप सिंग लाखेवाल यांच्या गावात फक्त २ किलोमीटरचे अंतर आहे.
मनदीप सिंग हे पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि मीडिया प्रभारीही आहेत. इतकेच नाही तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी मनदीप सिंग यांनी नरिंदर कौर यांच्या बाजूने निवडणूक प्रचारातही भाग घेतला होता. २८ वर्षीय नरिंदर हे पंजाब विधानसभेतील सर्वात तरुण आमदार आहेत.
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या तिकीटावर संगरूर मतदारसंघातून त्यांनी ३८ हजारांहून अधिक मतांच्या फरकाने आपली पहिली निवडणूक जिंकली. नरिंदर यांनी संगरूर मतदारसंघातून काँग्रेसचे दिग्गज नेते विजय इंदर सिंगला यांचा पराभव केला होता.
नरिंदर कौर यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते विजय इंदर सिंगला यांचा पराभव केला, जे काँग्रेस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही होते. त्याचवेळी, या निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाचे विनरजीत सिंग गोल्डी आणि भारतीय जनता पक्षाचे अरविंद खन्ना यांनीही नरिंदर यांच्याविरुद्ध लढत दिली.
महत्वाच्या बातम्या-
nashik : नाशिकमध्ये मृत्यूचं तांडव! बसला आग लागून १३ जणांचा होरपळून मृत्यू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः घटनास्थळी जाणार
Uddhav Thackeray : शिवसेनेवर वर्चस्व दाखवून देण्यात ठाकरे झाले यशस्वी; निवडणूक आयोगाकडे दिला ‘हा’ सर्वात मोठा पुरावा
Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंनी स्वतःच पक्ष सोडला मग चिन्ह त्यांचं कसं? निवडणूक आयोगात घडल्या मोठ्या घडामोडी