Share

शरद पवारांना ‘जाणता राजा’ पदवी दिली जाते, ते कुठे लढायला गेले होते? नरेंद्र पाटलांचा सवाल

sharad pawar narendra patil

सातारा : शरद पवार यांना जाणता राजा ही उपाधी दिली जाते, ते कुठे लढायला गेले होते? अशी घणाघाती टिका अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली. यावेळी टीका करतानाच नेत्यांना पदव्या देताना कार्यकर्त्यांनीही योग्य शब्दांचा वापर करावा, असे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

आता या वक्तव्यावरून पुन्हा वाद होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते या वक्तव्यावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे. पुर्वी राष्ट्रवादीतच काम केलेल्या. नरेंद्र पाटील यांनी थेट शरद पवारांवर टिका केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणीही अपमानास्पद वक्तव्य करणे अयोग्य आहे. शिवछत्रपती हे देशाचे आदर्श असून कोणत्याही महापुरुषाबद्दल वाईट बोलणे चुकीचे असल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. नरेंद्र पाटील म्हणाले, ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळात समन्वयाचा अभाव असल्याने व्याज परत करण्यात अडचणी आल्या.’

आता व्याज परताव्याची प्रकरणे निकाली काढून ती शून्य टक्क्यांवर आणली जात आहेत. 2018 पासून महामंडळाची जबाबदारी माझ्यावर आली असून या काळात मी 3500 कोटींचे कर्ज वाटप करून 50 हजार लाभार्थी जोडले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील 3 हजार 200 लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे. बहुतांश लाभार्थी परतफेड करत असल्याने विविध बँका या योजनेचे स्वागत करत आहेत.

दरम्यान, मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या सारथी योजनेतही सकारात्मक बदल करण्यात येणार आहेत. आर्थिक महामंडळाच्या योजनेतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू असून, यासंदर्भात यापूर्वीच बैठक झाली आहे.

यासोबतच महामंडळाच्या आराखड्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हा समन्वयकांची संख्या वाढवण्यात येणार असून येत्या काही वर्षांत एक लाख मराठा उद्योजक तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांबाबतही माहिती दिली.

गेल्या आठवड्यात करहर येथे भरलेल्या कृषी प्रदर्शनाच्या सुरुवातीच्या पत्रात माझे नाव आले. मात्र, प्रतापगडमधील शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमातून माझे नाव काढून टाकण्यात आले.

मी जिल्ह्याचा भूमिपुत्र असल्याने आणि राज्यस्तरीय पदावर कार्यरत असल्याने मला कार्यक्रमात समाविष्ट करणे अपेक्षित होते. मात्र, याबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून उत्तर मागणार असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या
जेव्हा स्मिता पाटीलच्या एका पोस्टरने घातला होता धुमाकूळ, हॅन्डपंपखाली करत होती अंघोळ
Sharad Pawar : शरद पवारांना मोठा धक्का! सर्वात जवळच्या अन् सर्वात जुन्या सहकाऱ्याने अचानक सोडला पक्ष
 जयंत पाटील नाही, तर राष्ट्रवादीचा ‘हा’ बडा नेता आहे भाजपच्या वाटेवर? शरद पवारांना बसू शकतो मोठा धक्का 

ताज्या बातम्या इतर राजकारण

Join WhatsApp

Join Now