Share

narendra modi : महाराष्ट्रातील ‘ही’ यात्रा ठरणार मोदींच्या पराभवाचे कारण; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

pm modi

narendra modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच चर्चेत असतात. मोदींचे दौरे, मोठं – मोठे निर्णय नेहमीच चर्चेचा विषय बनलेल आपण पाहिले आहे. अनेकदा मोदींवर विरोधक टीका करताना देखील आपण पाहिलेल आहे. असा असतानाच आता कॉंग्रेसच्या बड्या नेत्याने एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

सोमवारी साताऱ्यातील काँग्रेस भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. विशेष बाब म्हणजे, पंतप्रधान मोदींच्या पराभवाबाबत पृथ्वीराज चव्हाणांनी मोठं भाकीत केलं आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा उमेदवारच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करेल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे. पंतप्रधान मोदींनी निवडणूक आयोगासह इतर संस्थाही काबीज केल्या आहेत, असा गंभीर आरोप देखील चव्हाण यांनी केला.

यावेळी पुढे बोलताना चव्हाण म्हणाले आहे की, ‘लोकशाहीच्या संस्थेमध्ये सुप्रीम कोर्टही आहे, त्याच्यावरही नियंत्रण असल्यामुळं हा चर्चेचा विषय असल्याच त्यांनी म्हंटलं आहे. सध्या शिंदे – फडणवीस सरकारकडून राज्यावर अन्याय होणारे निर्णय घेतले जात आहेत.’

दरम्यान, चव्हाण यांनी यावेळी बोलताना राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ पदयात्रेसंदर्भात मोठं भाष्य केले आहे. येत्या ७ नोव्हेंबरला राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ पदयात्रा नांदेड जिल्ह्यात येणार असून ही पदयात्राच मोदींच्या पराभवाचे कारण ठरेल, असे चव्हाण यांनी म्हटले.

एवढंच नाही तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार घालविण्यासाठी काँग्रेसलाच पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठी काँग्रेस सोडून गेलेल्यांना पुन्हा स्वगृही आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
सनी देओलच्या मुलाचा झाला गुपचूप साखरपुडा; काय आहे नेमकं यामागील कारण वाचा
Sunny Deol: सनी देओलच्या ‘चुप’ने बाकीच्या चित्रपटांना केलं ‘चिडीचुप’ पहिल्याच दिवशी केली विक्रमी कमाई
Sunny Deol: राहायला नव्हते घर, उपाशीपोटी काढले दिवस, अजूनही मला.. सनी देओलच्या अभिनेत्रीची कहाणी ऐकून डोळ्यातून पाणी येईल

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now