निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलेलं असतानाच दुसरीकडे सध्या देशात अग्निपथ योजनेवरून गदारोळ पसरला आहे. केंद्र सरकारने लष्करात भरतीसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेला (Agneepath Yojana) देशातील अनेक भागांतून विरोध होताना दिसत आहे. याचे पडसाद देशभरात उमटले आहे.
मोदी सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाणासह विविध राज्यांमध्ये शुक्रवारी हिंसक निदर्शने करण्यात आली. तसेच या योजनेवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही टीका केली. ‘केंद्राला तीन कृषी कायद्यांसारखंच ही योजनाही मागे घ्यावी लागेल,’ असं म्हणत राहुल गांधींनी म्हंटलं होतं.
तर आता या योजनेवर खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केलं आहे. अग्निवीरच्या पार्श्वभूमीवर सुरु असणाऱ्या हिंचाचारासंदर्भात मोदींनी अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे. “हा आजचा नवा भारत आहे. हा भारत समाधान शोधतो. नव्या कामांसाठी इथे फार संकटांना तोंड द्यावं लागतं,” असं म्हटलं आहे.
तसेच केंद्र सरकारकडून दिल्ली-एनसीआरमधील करण्यात आलेल्या विकास कामाच्या अनुषंगाने मोदींनी भाषण केले आहे. नुकतेच मोदींच्या हस्ते प्रगती मैदान इंटिग्रेटेड ट्रान्झिट कॉरिडॉरच्या मुख्य बोगद्याचे आणि पाच अंडरपासचे करण्यात आले. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, अनेक दशकांपूर्वी भारताची प्रगती, सामर्थ्य, आणि संस्कृती दाखवण्याच्या उद्देशाने या मैदानाची निर्मिती करण्यात आली.’
‘मात्र प्रगती मैदानाची प्रगती फार आधीच थांबली होती. याची योजना केवळ कागदावर होती. प्रत्यक्षात काहीही झालं नाही,’ असं पंतप्रधान मोदींनी म्हंटलं आहे. ‘चांगल्या हेतूने राबवण्यात येणाऱ्या अनेक गोष्टी ह्या राजकारणात अडकल्या जात असल्याच देखील त्यांनी नमूद केलं.
दरम्यान, केंद्र सरकारने तरुणांना सैन्यात भरती करण्याच्या उद्देशाने अग्निपथ योजना आणली आहे. या माध्यमातून दरवर्षी सुमारे ४५ हजार तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात नोकरी मिळणार आहे. नोकरी मिळवण्यासाठी तरुणांचे वय १७.५ ते २१ वर्षे दरम्यान असावे. त्याचबरोबर त्यांच्या कार्यक्षमतेच्या आधारावर चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर यातील २५ टक्के तरुणांना कायमस्वरूपी केडरमध्ये भरती केले जाईल आणि उर्वरितांना सैन्यातून निवृत्त केले जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
करुणा शर्मा यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, जातीवाचक शिवीगाळ आणि नैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप
विधान परिषद निवडणुकीत देखील फडणवीसांचा करिश्मा! मविआतील पहिला आमदार फुटला?
‘मिल्ट्रीत जाणारा वाघ पैशांसाठी जात नाय, तो कुठल्या भावनेनं तिथं जातो हे तुझ्या डोक्याबाहेरचं’
अखेर सदाभाऊकडून भांडाफोड! ‘तो’ हॉटेलवाला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता; पुरावा केला सादर