narendra modi on argentina win | कतारमध्ये खेळल्या गेलेल्या फिफा विश्वचषक २०२२ मध्ये अर्जेंटिना संघाने अखेर ३६ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. फ्रान्स विरुद्धच्या थरार सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा विजय मिळवत अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे.
अर्जेंटिनाच्या या विजयासह जगप्रसिद्ध फुटबॉलपटू मेस्सीचे विजेतेपदाचे स्वप्नही पूर्ण झाले आहे. अर्जेंटिनाच्या या विजयाचा जल्लोष भारतातही पाहायला मिळाला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या विजयाबद्दल अभिनंदन केले.
नरेंद्र मोदी म्हणाले की, फिफा वर्ल्डकप २०२२ मधील हा सामना फुटबॉलमधील सर्वात रोमांचक सामन्यांपैकी एक म्हणून लक्षात राहील. अर्जेंटिना आणि मेस्सीचे करोडो भारतीय चाहते या शानदार विजयाने खुप खूश झाल्याचेही मोदींनी म्हटले आहे.
रविवारी झालेल्या एमबाप्पे विरुद्ध मेस्सीच्या या ड्रीम फायनलमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळाली. सामन्याच्या पहिल्या ६० मिनिटांत अर्जेंटिनाचा संघ २-० ने आघाडीवर होता पण ८१ व्या मिनिटाला एमबाप्पेने फ्रान्सला पुन्हा सामन्यात आणले.
https://twitter.com/narendramodi/status/1604540225761558533?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1604540225761558533%7Ctwgr%5E9614f1447b678b3e2d4ec0d5dae2cd0614f93b82%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.indiatvnews.com%2Fsports%2Ffootball%2Fargentina-vs-france-final-arg-vs-fra-pm-narendra-modi-congratulates-argentina-on-empathic-win-commiserates-france-after-hard-fought-defeat-messi-2022-12-19-832281
एमबाप्पेने ९७ सेकंदात २ गोल करत फ्रान्सचा स्कोअर अर्जेंटिनाच्या बरोबरीत आणला. अतिरिक्त वेळेतही मेस्सीने आघाडीचा गोल केला, तर एमबाप्पेने पेनल्टी किकवर गोल करून स्कोर लाइन बरोबरी केली. त्यामुळे स्कोर ३-३ असा होता. पण पेनल्टी शुटमध्ये या सामन्याचा निकाल लागला.
हा सामना जेव्हा पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचला तेव्हा अर्जेंटिनाने फ्रान्सचा ४-२ असा पराभव करून विश्वचषक जिंकला. पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सची कामगिरी खूपच खराब राहिलेली असून कतारमध्येही ते आपली कामगिरी सुधारण्यात अपयशी ठरताना दिसून आले.
महत्वाच्या बातम्या-
argentina : ३६ वर्षांचा दुष्काळ अखेर मेस्सीने संपवला, अर्जेंटिनाला पुन्हा बनवलं विश्वविजेता
पोलिस म्हणाले ‘तुमच्या हाॅटेलचा रस्सा चांगला नाही’; भडकलेल्या मालकाने दांडक्याने चोपले
सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी पिल्याने नक्की काय होतं? वाचून शॉक व्हाल