केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने विजय मिळवला आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील चारपैकी दोन नगरपंचायतींमध्ये शिवसेनेने सत्ता प्रस्थापित केली आहे. सिंधुदूर्गमधील कुडाळ नगरपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. कुडाळ नगरपंचायतीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसला मताधिक्य मिळालं असून नारायण राणेंना मोठा धक्का बसला आहे.
या निवडणुकीत शिवसेना पक्षाला ७ जागा आणि काँग्रेसला २ जागा अशा एकूण ९ जागा आघाडीला मिळाल्या आहेत. कुडाळ नगरपंचायत भाजपच्या हातून एका मताने गेली असून त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने किंगमेकरची भूमिका निभावली आहे. तर भाजप पक्षाने ८ जागांवर विजय मिळवला आहे. कुडाळ नगरपंचायतीत जरी राणेंना धक्का बसला असला तरी वैभववाडी नगरपंचायतीमध्ये नितेश राणेंनी गड राखला आहे. वैभववाडी नगरपंचायतीत भाजपला २ जागा मिळाल्या आहेत.
शिवसेनेला वैभववाडी नगरपंचायतीत फक्त १ जागा मिळाली आहे. वैभववाडी नगरपंचायतीवर भाजपने सत्ता प्रस्थापित केली आहे. वैभववाडी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयासमोर वैभव नाईक यांची विजयी मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला.
सिंधुदुर्गातील कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांना मोठा झटका बसला आहे. या निवडणुकीत भाजपने ७, शिवसेना २, तर राष्ट्रवादी आणि अपक्ष उमेदवाराने एका जागेवर विजय मिळवला.देवगड नगरपंचातीच्या निवडणुकीत शिवसेनेने ८ जागांवर विजय मिळवला आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेला फक्त १ जागा मिळावी होती.
रायगडच्या पोलादपूरमध्ये शिवसेनेने सत्ता मिळवली असून भाजपला मोठा फटका बसला आहे. पोलादपूर नगरपंचायतीत शिवसेनेला १० जागा मिळाल्या आहेत.या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळून ६ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत भाजप पक्षाला फक्त १ जागा मिळाली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत आर आर पाटील यांचे सुपूत्र रोहित पाटील यांनी विजय मिळवला आहे. कवळेमहाकांळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने १० जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली आहे. विरोधकांना फक्त ६ जागा मिळाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
पंकजा मुंडेच्या मार्गदर्शनाखाली ‘हा’ नेता ठरला किंगमेकर, तीन नगरपंचायतींवर भाजपचा झेंडा
पारनेरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीची काटे की टक्कर; जयश्री औटींचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी
पुष्पाने धुमाकूळ घातल्यानंतर अल्लू अर्जुनचा १०० कोटींचा आणखी एक सिनेमा हिंदीत प्रदर्शित होणार