Share

Narayan Rane : उद्धव ठाकरे एक नंबरचा लबाड आणि खोटारडा माणूस आहे; राणेंची घणाघाती टीका

narayan rane and uddhav thkare

narayan rane crititcize uddhav thackeray | केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नेहमी टीका करताना दिसून येतात. ते अनेकदा गंभीर आरोपही करत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी उद्धव ठाकरे यांना धारेवर धरले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहे .

नारायण राणे यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्याला जीवे मारण्यासाठी प्रयत्न केले होते, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरेंना संपुर्ण पत्रकार परिषदेत अरेतुरे केले आहे. तसेच अहोजाहो करण्याची त्यांची पात्रता नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी संघावर आणि भाजपवर टीका केली होती, त्यावरुनही राणे यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले आहे. राणेंनी उद्धव ठाकरेंना थेट धमकीच दिली आहे. जर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर उद्धव ठाकरे जबाबदार असतील असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. तसेच आपल्याला मारण्याची सुपारी उद्धव ठाकरेंनी दिली होती, असे त्यांनी म्हटले आहे.

मला मारण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी छोटा राजन, शकीलला माझी सुपारी दिली होती. पण नारायण राणे संपला नाही. संपणारही नाही. उद्धव ठाकरे एक नंबरचा खोटारडा आणि लबाड माणूस आहे. त्यांना फक्त त्यांचं कुटुंब प्रिय आहे. त्यांनी शिवसैनिकासाठी कधी काही केल्याचं मी ऐकलं नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंना काम करता येत नाही. त्यांना फक्त दुसऱ्यावर टीका करणं येतं. अडीच वर्षात अडीच तास मंत्रालयात गेलेला माणूस काय टीका करतोय. दसरा मेळाव्यात त्यांनी विचारधन देण्याऐवजी त्यांनी भाजप आणि संघाला शिव्या घातल्या. त्यांनी जर त्यांचं तोंड बंद केलं नाही, तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.

तसेच ज्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न केले, त्यांना ठाकरे आता गद्दार म्हणत आहे. पण शिवसेना वाढण्यासाठी उद्धव ठाकरेंचं योगदान काय? कधी मातोश्री सोडून गेले काय ते? उद्धव ठाकरेंमुळे शिवसेना घराघरात पोहचली नाही, असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
Uddhav Thackeray : स्मिता-जयदेव ठाकरेंनी बाळासाहेबांना नेहमी मनस्तापच दिला आणि आता त्यांनाच तुम्ही…आत्तेबहीणीचा शिंदेंवर गंभीर आरोप
Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंनी स्वतःच पक्ष सोडला मग चिन्ह त्यांचं कसं? निवडणूक आयोगात घडल्या मोठ्या घडामोडी
Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांचा सत्तांतराचा गौप्यस्फोट शिंदे गटाने फेटाळला, केसरकरांनी केला मोठा खुलासा

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now