Share

nanded : अरे बापरे! नांदेडची महिला एका रात्रीत झाली ८ कोटींंची मालकीण, वाचा नक्की काय घडलं 

vaishali

nanded vaishali get win lottery  | कधी कोणाचं नशीब चमकेल हे सांगता येत नाही. काही लोक तर एका रात्रीतच लखपती, करोडपती होतात. याचे अनेक किस्सेही समोर आले आहेत. आता असाच एका प्रकार नांदेडमधून समोर आला आहे. नांदेडमधील एक महिला एका रात्रीत करोडपती झाली आहे.

नांदेड जिल्ह्यात राहणाऱ्या त्या महिलेचे नाव वैशाली असे आहे. वैशाली या आपल्या पतीसोबत बाहेर चालल्या होत्या. अशात त्यांच्या ट्रकचे इंधन संपत आले होते. त्यामुळे त्यांनी ट्रक पेट्रोल पंपावर नेला. इंधन भरेपर्यंत वैशाली या ट्र्कच्या खाली उतरल्या आणि तिथे फिरु लागल्या.

अशात वैशाली यांना एक लॉटरीचं दुकान दिसलं. तिथे त्यांनी लॉटरी घेतली. लॉटरीचं तिकीट घेतल्यानंतर काहीच तासांमध्येच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्यांना ती लॉटरी लागली. त्यांनी लॉटरीमध्ये तब्बल ८ कोटींपेक्षा जास्त रक्कम जिंकली आहे.

आपल्याला लॉटरी लागली आणि आपण ८ कोटी रुपये जिंकले आहे, यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. लॉटरी लागल्यामुळे वैशाली खुपच खुश झाल्या असून त्यांच्या कुटुंबालाही खुप आनंद झाला आहे. या लॉटरीच्या तिकीटामुळे त्या एका रात्रीत करोडपती झाल्या आहे.

तसेच लॉटरी जिंकल्यानंतर त्यांनी प्रतिक्रियाही दिली आहे. लॉटरी जिंकल्यामुळे मी खुप खुश आहे. मी लॉटरी जिंकलीये याच्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. जेव्हा मला कळलं की मी लॉटरी जिंकली आहे. तो क्षण माझ्यासाठी खरंच आश्चर्याचा धक्का देणारा होता.

तसेच वैशाली यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की,  त्यादिवशी ट्रकमधील इंधन संपत आले होते. त्यामुळे मी माझ्या पतीला ट्रक बाजारजवळच्या पेट्रोल पंपावर नेण्यास सांगितले होते. तिथे माझं एक कामही होतं. त्यामुळे मी खाली उतरले आणि काम झाल्यानंतर सहज लॉटरीचं तिकीट घेतलं.

महत्वाच्या बातम्या-
amit shaha : अन् त्याक्षणी अमित शाहांनी ठरवलं की मविआ सरकार खाली खेचायचं; वाचा सत्तांतराची Inside Story
nanded : ट्रक पेट्रोल पंपावर थांबवला अन् महिलेचं नशीबच पलटलं, एका झटक्यात झाली ८ कोटींची मालकीण
gautam gambhir : धोनी, सचिन किंवा मी नाही तर ‘हा’ मराठमोळा खेळाडू होता २०११ च्या वर्ल्डकपचा खरा हिरो; गंभीरने सांगीतले नाव

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now