Share

धक्कादायक! सुखी संसाराच्या स्वप्नांचा चुराडा; अपघातात नववधुचा मृत्यू, नवरदेव गंभीर जखमी

accident

महाराष्ट्र पुन्हा एकदा एका भीषण अपघाताने हादरला आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पोला प्रवासी वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातात सुखी संसाराच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. यात नवरीसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. (nanded accident 8 people killed in accident)

नांदेड जिल्ह्यातील भोकर ते हिमायतनगर रस्त्यावर हा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात प्रवासी वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये नवरीसह आठ जणाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. वऱ्हाडी हे उमरी तालुका जारीकोट या गावातील आहे.

ही घटना सुमारे सायंकाळी सात वाजता घडली असल्याची माहिती मिळाली आहे. भोकर ते किनवट रस्त्यावरील सोमठाणा पाटी जवळ असलेल्या एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या ॲपे ऑटो (क्र.एम.एच.२९-ए.आर.३२२९) आणि ट्रकचा (क्र.एम.एच.०४-ए.एल.९९५५) यांच्यात हा भीषण अपघात झाला.

तसेच मिळालेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारी रोजी जारीकोट ता. धर्माबाद येथील नवरदेव नागेश साहेबराव कन्नेवाड यांचे साखरा ता. उमरखेड येथील पूजा तामलवाड यांच्याशी साखरा ता. उमरखेड येथे लग्न झाले होते. त्यानंतर आज मांडव परतणीसाठी जारीकोट येथून साखरा येथे भोकरमार्गे मॅजिक वाहनाने जाताना हा अपघात घडला आहे.

या अपघातात पाच जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाणून पाहणी केली. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. मृतांची ओळख पटविण्याचे कार्य सध्या सुरू आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राजस्थानमधील कोटा येथे असाच एक भयानक अपघात झाला होता. लग्न लावण्यासाठी कुटुंबीयात मोठ्या उत्साहात घरातून निघाले होते. याच दरम्यान, एका भरधाव स्कॉर्पिओ कारनं ओव्हरटेक करण्याच्या नादात लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेल्या बसला समोरासमोरच जोरदार धडक दिली.

यात वाहनांचा चक्काचूर झाला. स्कॉर्पिओमध्ये असलेल्या चार जणांचा मृत्यू झालाय. तर सहापेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले. धक्कादायक बाब म्हणजे, मृतांमध्ये नवरदेवाचाही समावेश होता. या भीषण अपघाताने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या
नीता अंबानी आपल्या पुतण्याच्या लग्नात पडल्या एकट्या, व्हायरल फोटोंमुळे नेटकऱ्यांना पडला प्रश्न
मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यात का पडली वादाची ठिणगी? अखेर कारण आले समोर
खाता का नेता, म्हणणारे हे वडापाव विकणारे चाचा कोण आहे माहितीये का?
भैय्यु महाराजांच्या आत्महत्येच्या प्रकरणात भक्तांनी केली ‘ही’ मागणी, आरोपी हायकोर्टात

इतर क्राईम राज्य

Join WhatsApp

Join Now