तर दुसरीकडे राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. कॉंग्रेसने मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकांचे पार्श्वभूमीवर घोषणांचा पाऊस पाडला जातं आहे. अशातच काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोठी घोषणा केली आहे.
महाराष्ट्रात एक कोटी तरुणांना रोजगार देणार असल्याची माहिती काल नाना पटोले यांनी दिली. काल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवस आहे. वाढदिवाचे औचित्य साधून नाना पटोले यांनी ही घोषणा केली आहे. तर या घोषणेचा निवडणुकांच्या निकालावर काय परिमाण होतोय? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले, ‘दोन ट्रिलियन डॉलरची इकोनॉमी तयार करून राज्यातील तरूणांना एक कोटी तरूणांना रोजगार देण्याचा काँग्रेसने संकल्प केला आहे. हा संकल्प पूर्णत्वास नेहण्यासाठी मी प्रयत्न करण्याचा संकल्प वाढदिवसानिमित्त करत असल्याचे पटोले यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.
दरम्यान, याबद्दल पुढे बोलताना पटोले यांनी सांगितले की, ‘आम्ही राज्यातील बळीराजासाठी दोन ट्रिलियन डॉलरची इकोनॉमी तयार करत आहोत. याच इकोनॉमीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. याचबरोबर आम्ही इकोनॉमीच्या माध्यमातून एक कोटी तरुणांना रोजगार देणार आहोत, असंही त्यांनी म्हंटले आहे.
नाना पटोले हे सातत्याने केंद्र सरकारला धारेवर धरत आहे. पुन्हा एकदा पटोले यांनी मोदी सरकार निशाणा साधला आहे. ‘आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. मात्र असे असून देखील येथील शेतकरी हा नेहमीच देणाऱ्याच्या भूमिकेत असतो. मात्र, भाजप सरकारने याच शेतकऱ्याला मागणाऱ्याच्या भूमिकेत ढकलले असल्याच पटोले यांनी म्हंटले आहे.