‘2024 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच सर्वाधिक जागा मिळवील. पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल’, असा मोठा दावा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. सध्या पटोले यांच्या दाव्याने ठाकरे सरकारमधील बड्या नेत्यांनी भुवया उंचवल्या आहेत. याचबरोबर उलटसुलट चर्चा देखील सुरू झाल्या आहेत.
तसेच पटोले यांच्या या दाव्यानं राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीत काय प्रतिक्रिया उमटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नुकतेच पाच राज्यातील निवडणुकीचे निकाल हाती आले असून त्यात कॉंग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कामगिरीवर विचारमंथन करण्यासाठी रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
रविवारी काँग्रेस कमिटीची वरिष्ठ नेत्यांसमवेतची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी महाविकास आघाडी सराकरमधील काँग्रेस पक्षाने एल्गार पुकारल्याचे दिसून येत आहे. पटोलेंनी थेट 2024 च्या निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला.
https://twitter.com/NANA_PATOLE/status/1503294350955991043?s=20&t=pRthQO5Wot9WJ4MnyKGgFw
दरम्यान, यापूर्वीही पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचा दावा करत ‘एकला चलो रे’चा नारा दिला होता. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. आता पुन्हा एकदा पटोले यांनी अशा पद्धतीचे ट्विट केल्याने खळबळ उडाली आहे.
ट्विटमध्ये पटोले म्हणतात, ‘2024 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच सर्वाधिक जागा मिळवील. पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल.’ तर एकीकडे देशपातळीवर काँग्रेसचं नेतृत्व कुणाकडे द्यायचं यावर चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या या वक्तव्यानं अनेकांना धक्का बसला आहे.
दरम्यान, राज्यात भाजपला डावलून शिवसेना-राष्ट्रवादी- काँग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. मात्र अनेकदा नाना पटोले हे निवडणुका लढवण्याबाबत असो किंवा सत्तेतील वाटा असो या गोष्टींवर सडेतोडपणे बोलताना दिसून आले आहेत. आज पुन्हा एकदा ट्विट करत त्यांनी सूचक इशारा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पाकिस्तानी दौऱ्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला जेवणात दाल-रोटी दिल्याने चाहते संतापले, म्हणाले..
मायावतींनी आपल्या पराभवासाठी धरले ‘या’ गोष्टीला जबाबदार; म्हणाल्या, यापेक्षा वाईट काय असू शकते
आठवीची विद्यार्थीनी घरातून झाली फरार, व्हॉट्सऍपच्या ब्लॉक लिस्टमध्ये सापडले ३६ मुलांचे नंबर
सत्तेत येण्यापु्र्वीच भगवंत मान यांचा मोठा निर्णय, माजी मंत्री आणि आमदारांची सुरक्षा घेतली काढून