गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर येत आहे. अशातच आता कॉंग्रेसने आता थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसवर गंभीर आरोप केले आहे. यामुळे पुन्हा एकदा ठाकरे सरकारमधील नाराजीनाट्य समोर आलं आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोपांचा सपाटा सुरुच ठेवला आहे. आज देखील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजपला मदत केल्याच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे. यामुळे आता वातावरण आणखीच तापलं आहे. यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? असा सवाल सध्या उपस्थित होतं आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले, ‘गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. हे काम सातत्याने सुरू आहे. याची तक्रार मी चिंतन शिबिरात हायकमांडकडे केली आहे.’ त्यांनी हे सर्व ऐकून घेतलं असून संदर्भात आता पुढील रणनीती ठरवली जाईल, असं त्यांनी सांगितलं आहे.
यावेळी पत्रकारांनी ‘काँग्रेस सरकारमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे का?’ या प्रश्नाचे उत्तर देताना नाना पटोले यांनी म्हंटलं आहे की, येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला परिणाम दिसतीलच, आम्ही सत्तेत राहण्यासाठी सरकारमध्ये नाही. काँग्रेसला देशाची चिंता आहे, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.
दरम्यान, यावेळी बोलताना पटोले यांनी ‘2 ॲाक्टोबरपासून काँग्रेस देशभरात पदयात्रा काढणार, असल्याची माहिती दिली. तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ऐकला चलो रे वर काँग्रेस ठाम असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. यामुळे आता कॉंग्रेसच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
तर दुसरीकडे याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी सावध पवित्रा घेत कुटुंबात भांड्याला भांडं लागतच असतं. तक्रार करण्याची आपली परंपराच आहे, असं म्हटलं आहे. अद्याप यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी भाष्य केलेलं नाहीये.
महत्त्वाच्या बातम्या
घराच्याघरी मडक्यात उगवा मशरूम आणि कमवा बक्कळ पैसा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
IPL चे पाकिस्तान कनेक्शन झाले उघड, सट्टेबाजांवर BCCI ने केली ‘ही’ मोठी कारवाई
PHOTO: नेहा शर्माने पार केल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, शर्टाचे बटन उघडे ठेवून केले बोल्ड फोटोशूट
भाऊ कदम आहे साधाभोळा, पण त्याची मुलगी मात्र आहे खूपच ग्लॅमरस; फोटो पाहून तुम्हीही व्हाल दंग






