Share

पाटील विरूद्ध पटोले! माझ्या विरोधात जायचं तिकडं जा, आम्ही देश विकणाऱ्यांविरोधात कोर्टात जाणार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे. पटोले यांच्या विरोधात ठिकठिकाणी भाजपा नेत्यांनी निदर्शनं केली आहेत. अनेकांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी तर पटोलेंविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे, त्याला आता नाना पटोलेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटलांनी माझ्या विरोधात कुठे जायचं तिकडं जावं, आम्हीही देश विकाणाऱ्यांविरोधात कोर्टात जाणार असे नाना पटोले म्हणालेत.

याबाबत बोलताना पटोले म्हणाले, ‘चंद्रकांत पाटलांनी माझ्या विरोधात कुठे जायचं तिकडं जावं, आम्हीही देश विकाणाऱ्यांविरोधात कोर्टात जाणार असे नाना पटोले म्हणालेत. विमानतळ विकले, समुद्र विकले, कंपन्या विकल्या आहेत, त्याविरोधात आम्हालाही कोर्टात जावं लागेल असे नाना पटोले म्हणाले आहेत.

तसेच भंडारा पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. त्यात सत्य समोर येईल. पंतप्रधान पदाची गरीमा संपवणे हाच भाजपचा धंदा आहे. त्यामुळे त्यांनी हे सुरू केले आहे. आम्हीही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भाजपविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे. असेही ते म्हणाले. तसेच मोदी नावाचा गुंड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे, जबाब नोंदवणे सुरू आहे, अशी माहिती पटोलेंनी यावेळी दिली आहे.

दरम्यान दुसरीकडे नाना पटोले यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘जे काही वक्तव्य माझ्या नावाने दाखवले जात आहे, लोक माझ्या बाजूला गोळा झाले आहे. सध्या आमच्या जिल्ह्यात निवडणुका सुरू आहे आणि त्या प्रचारादरम्यान लोकांनी माझ्याकडे गावातील मोदी नावाच्या गुंडाबद्दल तक्रार केली होती. त्यामुळे मी त्या गावगुंडाला बोलू शकतो.’

याचबरोबर वेळ आली तर मारू सुद्धा शकतो, तुम्हाला काही घाबरण्याचे कारण नाही, असं आश्वासन दिले होते. मी त्या गावगुंडाबद्दल बोललो होतो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोललो नाही, असा खुलासा नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
नाना पटोलेंना जेलची हवा खावी लागणार? भाजपने उचलले कडक पाऊल
“आज आम्ही तुमच्या बाजूने उभं राहिलो नाही तर आम्हांला झोप येणार नाही”
घटस्फोट मृत्युपेक्षा जास्त वेदना देतो; १२ वर्षानंतर तुटलेल्या नात्यावर बोलला ‘महाभारताचा कृष्ण’
चक्क स्वत:च्या ओंजळीने सापाला पाणी पाजतोय हा पठ्ठ्या; व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now