Share

‘सगळे छान सलोख्याने राहत असताना कुठेतरी मध्ये बिब्बा घालण्याची गरज नाही’; नानांची ‘द काश्मीर फाईल्स’वर प्रतिक्रिया

Nana Patekar

अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर असे कलाकार मुख्य भूमिकेत असलेला ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालत असून प्रेक्षकांचा चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या दिग्दर्शनाचे आणि चित्रपटातील कलाकारांचे भरभरून कौतुक केले जात आहे.

प्रेक्षकांसोबत अनेक सेलिब्रिटीसुद्धा या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. तर एकीकडे या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे अनेकजण यावर टीकाही करत आहेत. यावरून सोशल मीडियावर चित्रपटाला पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे असे दोन गट पडल्याचेही पाहायला मिळत आहे. यादरम्यान या चित्रपटावरून होणाऱ्या वादावर अभिनेते नाना पाटेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नाना पाटेकर यांनी पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयाच्या सिम्बी ऑनलाईन मोबाईल अॅपच्या लॉन्चवेळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावरून पडलेल्या गटाबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्यांनी चित्रपट चित्रपटासारखाच पाहावा, त्यातून समाजात तेढ निर्माण होणं योग्य नाही, असे म्हटले.

नाना पाटेकर यांनी म्हटले की, ‘मला असं वाटतं की, इथले हिंदू आणि मुसलमान हे इथलेच आहेत. त्यामुळे त्यांनी एकत्र राहणे गरजेचे आहे आणि त्यांनी एकत्रच राहावं. यात जर गट पडत असतील, तर ते चुकीचं आहे. गट पाडण्याची गरज नाही. मी अद्याप चित्रपट पाहिलेला नाही. त्यामुळे चित्रपटाबाबत मला सविस्तर काही बोलता येणार नाही. जर चित्रपट पाहिला असता तर मला बोलता आलं असतं. पण एखाद्या चित्रपटाबाबत अशी कॉन्ट्रोव्हर्सी होणे हे बरं नाही’.

‘चित्रपटाविषयी तेढ कुठला समाज निर्माण करतो अशातला भाग नाहिये. ही तेढ जर कुणी निर्माण करत असेल, तर त्या माणसाला नक्की प्रश्न विचारा. कारण सगळे छान सलोख्याने राहत असताना त्यात बिब्बा घालायची काही गरज नाही. चित्रपट आहे तो तसाच पाहावा. त्यातील वस्तुस्थिती काहींना पटेल, काहींना पटणार नाही. त्यामुळे वाद निर्माण होणे साहजिक आहे. पण म्हणून त्यातून समाजात तेढ निर्माण होणं हे काही योग्य नाही, असेही नाना पाटेकर यांनी यावेळी म्हटले.

महत्त्वाच्या बातम्या :
सावधान! तुम्हालाही काश्मिर फाईल्स मुवीची लिंक आली असेल तर करू नका ओपन, पडेल महागात
फक्त अनुपम खेरच नाहीत तर ‘हे’ 8 प्रसिद्ध कलाकारही आहेत काश्मिरी पंडित, नावं वाचून अवाक व्हाल
..तेव्हा मी रडत रडत भर उन्हात मरीन ड्राईव्हवरून वांद्र्यापर्यंत पायी गेले, विद्या बालनचा धक्कदायक खुलासा

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now