Share

छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करणे फार सोपे आहे पण.., नाना पाटेकरांचे वक्तव्य चर्चेत

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला मुग्लांच्या सत्तेतून बाहेर काढले. शनिवारी म्हणजे १९ फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराजांची जयंती असते. ही जयंती संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोषात साजरी करतात. सर्व शिवप्रेमी आपापल्या पद्धतीने शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात. महाराजांनी सर्वांनाचं अनेक उत्तमाच्या शिकवणी दिलेल्या आहेत.

याच संदर्भात अभिनेते नाना पाटेकर यांनी आपले विचार मांडले आहेत. नाना पाटेकर यांनी आपल्या प्रतिक्रियेतून सर्व लोकांना जागे केले आहे. एका कार्यक्रमात त्यांनी आपले विचार मांडले. हा कार्यक्रम बाणेरमध्ये आयोजित केला होता. स्वराज्य प्रतिष्ठान बाणेरच्या माध्यमातून तसेच नगरसेविका स्वप्नाली प्रल्हाद सायकर यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अनावरणाचा होता. याच प्रसंगी अभिनेते नाना पाटेकर यांनी आपले मत मांडले.

ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करणे फार सोपे आहे. मात्र त्यांचे विचार आचरणात आणणे खूप अवघड आहे. त्यांचे विचार घेऊन एक पाऊल जरी चालता आले तरी ते फार महत्त्वाचे आहे. जय भवानी जय शिवाजी बोलणे खूप सोपे आहे. सर्व धर्माच्या व जातीच्या लोकांना एकत्र घेऊन शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य स्थापन केले आहे.”

तसेच नाना पुढे म्हणाले की, “ त्यांच्यात प्रत्येकाला सामावून घेण्याची ताकत होती. त्यांनी सर्वांना समान न्याय दिला. महाराजांनी आपल्या राज्यात कधीही जातीभेद केला नाही. ज्यादिवशी आपण माणसाला माणूस म्हणून ओळखायला लागू. त्यादिवशी खऱ्या अर्थाने शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा सन्मान केला जाईल.”

पुढे बोलताना नाना पाटेकर म्हणाले की, “महाराजांनी सर्वांना समान न्याय दिला. सर्वांना सामावून घेतले. महाराजांची शिकवण आहे त्यामुळे नक्कीच समाज समृद्ध होईल. इतिहासाच्या नावाखाली विकृतीचे रंग पेरू नका. सर्वच लोक तसे नाहीत. पण काही थोड्या लोकांमुळे ही विकृती पसरली आहे. कुठलाही धर्म हा दुसऱ्याच्या धर्माच्या द्वेषाच्या आधारित नसावा. मी हिंदु आहे जन्मलो हिंदू व मरणार देखील हिंदू परंतु आपल्याला दुसऱ्या धर्माबद्दलही आदर पाहिजे. ”

तसेच यावेळी बाणेर येथे स्वराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या स्मारकाचे त्यांनी कौतुक केले. या ठिकाणी नुसते स्मारक न उभारता स्मारकाच्या माध्यमातून वाचकांसाठी लायब्ररी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांनी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रल्हाद सायकर आणि नगरसेविका स्वप्नाली प्रल्हाद सायकर यांचे कौतुक केले.

त्याचबरोबर स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रल्हाद सायकर म्हणाले की, “१ वर्षापूर्वी या ठिकाणी स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते. चार ते सहा महिन्यांमध्ये हे स्मारक उभे करण्याचे ठरवले होते. मात्र कोरोनाच्या महामारीमुळे या स्मारकाच्या अनावरण करण्यास उशीर झाला. हे स्मारक कोणत्याही प्रकारचा शासकीय निधीतून बांधले नाही. या स्मारकासाठी सर्वांना आवाहन केले होते. त्या माध्यमातून स्मारकासाठी ६४ लाख रुपये जमा झाले. फक्त स्मारक उभारणे हा हेतू नसून महाराजांच्या विचारांची प्रेरणा मिळावी हा हेतू आहे. त्यामुळेच वाचनालय देखील निर्माण केलं आहे. तसेच यावेळी सर्वांनी स्मारकासाठी मदत केली त्यांचे अभिनंदन.”

या कार्यक्रमाच्या वेळी ज्येष्ठ कलाकार नाना पाटेकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्मारकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, हे प्रमुख उपस्थित होते.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now