स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या लोकप्रिय मालिकेतून अभिनेते किरण माने यांना तडकाफडकी काढण्यात आल्यानंतर राजकीय वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर राजकीय भूमिका मांडल्याबद्दल आपल्याला काढण्यात आल्याचा आरोप माने (kiran mane) यांनी केला आहे. तर, गैरवर्तनामुळं मानेंवर कारवाई करण्यात आल्याचं निर्मात्यांकडून सांगण्यात आलं आहे. (Nana Patekar criticizes Kiran Mane)
याचाच धागा पकडत जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी किरण माने या प्रकरणावर भाष्य केले. ‘आजूबाजूला काय चुकीचं किंवा बरोबर चाललंय याच्याशी मला काही देणंघेणं नाही. मी माझं काम करत राहतो. माझी राजकीय भूमिका कशासाठी असावी? समाजाप्रती भूमिका काय आहे ते महत्त्वाचं असल्याचे रोखठोक मत नाना पाटेकर यांनी मांडले आहे.
याबाबत ते पुण्यात पत्रकरांशी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आपण आपल काम करत राहायचं आणि एक दिवस कापरासारखं विरून जायचं. हा कसा वाईट? तो कसा वाईट? हे सगळं बघत बसायला मला वेळ नाही. परतीच्या वाटेवर असताना तुम्हाला काही गोष्टी सुचत असतील तर इमानानं करा, एवढंच मला कळतं; असं नाना पाटेकर यावेळी बोलताना म्हणाले.
दरम्यान, ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या नथुराम गोडसे यांच्या भूमिकेवरून सध्या वाद निर्माण झाला आहे. या वादात पाटेकर यांनी कोल्हेंची बाजू घेतली आहे. ‘अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत, त्यांनी कोणती भूमिका करायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तीस वर्षांपूर्वी मीही गोडसेंची भूमिका केली होती. याचा अर्थ मी त्याचं समर्थन करत नाही. समर्थन करत असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. भूमिका करणं हे माझं उपजीविकेचे साधन, यात माझी चूक आहे का? प्रत्येक गोष्टीचं भांडवल करायची गरज नाही, अशा शब्दांत त्यांनी कोल्हेंच्या टीकाकारांना सुनावलं.
शनिवारी पुण्यातील सर्किट हाऊस येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांना नाना पाटेकर भेटले. याभेटीनंतर नानांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना नानांनी अजित पवारांच्या कामांचे कौतुक केले. तसेच अजित पवार ज्या पद्धतीने काम करतात ते आपल्या कामाची कधीच जाहिरात करत नाहीत. ते आपलं काम करत राहतात, असे नाना पाटेकर यावेळी बोलताना म्हणाले.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘अजित पवारांची एखादी चुकीची गोष्ट तेवढीच अधोरेखित होत राहते. त्यांनी केलेलं काम हे समोर यायला पाहिजे. ते एक चांगला नेता आहेत. राजकारणी लोकांनी केलेल्या कामाला जितकी प्रसिद्धी मिळायला पाहिजे तेवढी मिळत नाही. आम्ही अगदी छोटसं काम जरी केलं तरी तुम्ही खूप मोठं दाखवता आणि सरकारने केलेल्या कामाची किंमत राहत नाही हे असे असता कामा नये, असे स्पष्ट मत नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.
दरम्यान, पुढे बोलताना नाना पाटेकर यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर भाष्य केले आहे. ‘मला असं वाटतं पक्ष बदलणाऱ्या माणसाला पाच वर्ष कोणीही तिकीट देऊ, मग पहा नका कुणीही पक्ष बदलणार नाही. तिथे काहीतरी नियम असायलाच पाहिजे, असे परखड शब्दात नानांनी मत व्यक्त केले.
महत्त्वाच्या बातम्या
तीन अल्पवयीन मुलांनी घेतला तरुणाचा जीव; पोलिसांना म्हणाले, आम्ही पुष्पा बघितला म्हणून…
फडणवीसांचा पर्रिकरांना डावलण्याचा निर्णय फसला, बाबूश मोन्सेरात ‘या’ प्रकरणात अडकले
नागपूरात १०० रूपये तिकीटात बघायला मिळतोय महीलांचा नग्न डान्स; राज्यात खळबळ, विरोधी पक्ष आक्रमक
‘एकाही घराला धक्का लागू देणार नाही, जबरदस्तीने बाहेर काढलंच तर भारत बंद करूयात”