आपला भारत देश विविध परंपरेने नटलेला आहे. तसेच आपण आजूबाजूला जादूटोणा, अंधश्रद्धाच्या अनेक घटना घडलेल्या पाहतोच. वंशाला दिवा हवा या हट्टापायी अनेकजण मुलीला नाकारतात. तसेच मुलगा होण्यासाठी काही जण वेगवेगळ्या मार्गांचा उपयोग करतात.
अनेकदा यामधून फसवणूक झाल्याच्या देखील घटना घडल्याचे आपण वाचले आहे. अशीच एक धक्कादायक घटना पाकिस्तानमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. एका गर्भवती महिलेच्या डोक्यात दोन इंच लांब खिळा ठोकल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेला तीन मुली आहेत आणि चौथ्यांदाही तिच्या गर्भात मुलगीच होती. त्यामुळे ती एका फॅथ हिलरच्या संपर्कात आली, यावेळी त्याने मुलगाच होणार याची खात्री देत महिलेच्या डोक्यात खिळा ठोकला असल्याची माहिती मिळाली आहे
धक्कादायक बाब म्हणजे, खिळा आतमध्ये घुसवण्यासाठी हातोडीचा किंवा इतर जड वस्तूचा वापर केला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मात्र नशीब बलवत्तर असल्यामुळे डोक्यात हा खिळा आतपर्यंत गेला नाही. मात्र डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेच्या डोक्याच्या वरच्या भागात खड्डा झाला होता.
दरम्यान, याबाबत सुरुवातीला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना या महिलेने कोणाच्यातरी सल्लावरुन तिने स्वतः आपल्या डोक्यात खिळा ठोकून घेतला असल्याची माहिती दिली. परंतु काही वेळाने या महिलेने वेगळी माहिती पोलिसांना दिली. कोणतरी दुसऱ्या व्यक्तीने डोक्यात खिळा ठोकला असे त्या महिलेने सांगितले.
दरम्यान, पोलिस आता या प्रकरणाचा अधिक शोध घेत आहेत. तर दुसरीकडे याबाबत अधिक माहिती देताना डॉक्टर हैदर खान यांनी सांगितलं की आधी महिलेनं स्वतः हा खिळा डोक्यातून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, खिळा न निघाल्याने ती पेशावरच्या उत्तर-पश्चिमी शहरातील एका रुग्णालयात गेली. तेव्हा डोक्याचा एक्स-रे मध्ये दोन इंचाच खिळा दिसला.
महत्त्वाच्या बातम्या
बाबो! मोदींच्या एका तासाच्या विमान प्रवासासाठी खर्च होतात ‘इतके’ कोटी रुपये, वाचून थक्क व्हाल
श्रेयस अय्यर झाला मालामाल, केकेआरने खरेदी केले १२.२५ कोटींमध्ये; डोक्यावर सजणार कर्णधारपदाचा मुकूट
”तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही याचा पुरावा आम्ही कधी मागितला का?”
अशिक्षित मेस्त्रीने काही मिनिटांत अडीच टनांचे शिवलिंग पिंडीवर बसवले, भलेभले अधिकारी इंजिनिअर झाले होते फेल