महाराष्ट्रात नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपट प्रदर्शित होईन पाच दिवस उलटून गेली आहेत. समाजाचे दुहेरी वास्तव दाखणाऱ्या नागराजच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दाखवली आहे. परंतु याच्या उलट या चित्रपटावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून टीका सुध्दा होताना दिसत आहेत. मात्र या टीकांना मी चित्रपटाच्या माध्यमातून उत्तर दिल्याचे नागराज मंजुळेने म्हटले आहे.
झुंड चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर नागराज मंजुळे यांनी साम टीव्हीला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याने म्हटले आहे की, सोशल मिडीयाला डोक नसतं. चेहरा नसतो. त्यामुळे तेथील गोष्टी गांभीर्याने घेण्याची गरज नसते. सोशल मिडीया हे माध्यम मला मशिन सारखे वाटते. त्यामुळे त्यावर झालेल्या टीकांना मी गांभीर्याने बघत नाही.
पुढे नागराजने सांगितले, जर तुम्हाला खरच तक्रार करायची आहे तर माझ्या समोर येऊन करा. सोशल मिडीयावर कोण तक्रार करत. चित्रपटाची चिरफाट करुन मला जर त्यातील चुका सांगितल्या तर मला ही नक्की काय म्हणायचाय हे सांगता येईल.
इतकेच नव्हे तर, मला जे सांगायचे होते ते मी चित्रपटातून सांगितले आहे. आता त्याला वेगळी पुरवणी जोडायची गरज काय? असा प्रश्न नागराजने विचारला आहे. यावेळी त्याने म्हटले आहे की, माझ्या फिल्मचा हाच हेतू आहे की, आपण एकमेकांना प्रेमाचा हात देऊन पुढे जावे. ना की त्याना मागे खेचावे..
दोन दिवसापूर्वी लेखिका शैफाली वैद्यने नागराजवर टीका करत म्हटले होते की, इतका राग होता ‘उच्चवर्णिय प्रस्थापितांवर’ तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला? यावर नागराजने उत्तर देत म्हटले का, मी कुठे रागराग केला आहे. चित्रपटात कुठे दिसत आहे का, मी राग केला आहे. तसे असेल तर ते चित्रपटात शोधून दाखवा.
दरम्यान मराठी कलाकार सुध्दा झुंडचे कौतुक करत आहेत. मला अनेकजण चित्रपट चांगला झाला आहे हे सांगत आहेत. अशी माहिती नागराज मजुळेंनी मुलाखतीत दिली आहे. सध्या झुंड चित्रपटाची तुफान चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटाने कोटी रुपयांचा गल्ला केला आहे.
महत्वाच्या बातम्या
दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच हटवला युक्रेनमधील ‘हा’ येशूचा पुतळा, वाचा यामागचे मुख्य कारण
PHOTO: कोण आहे सपना भाभी जिच्या हॉट फोटोंनी सोशल मिडीयावर घातलाय धुमाकूळ?
ईडी, आयटीच्या धाडी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरच का? भाजपवाले रस्त्यावर भीक मागतात का?
दोन महिलांसोबत एकाचवेळी मसाज घेत होता शेन वॉर्न, CCTV फुटेज आले समोर