दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा झुंड चित्रपट प्रेक्षकांचा आवडता चित्रपट ठरला आहे. नागपूरचे विजय बारसी यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून चांगली कमाईही केली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या यशानंतर नागराज मंजुळेंचा वेगवेगळ्या ठिकाणी लोक सत्कार करताना दिसत आहेत.
नुकताच नागपूरमध्येही नागराज मंजुळे यांचा सत्कार समारंभ संयुक्त महिला सत्कार समितीच्यावतीने पार पडला आहे. यावेळी नागराज यांनी आपल्या मनातील एक इच्छा व्यक्त करुन दाखविली आहे. तसेच यावेळी ते भावूक झालेले दिसून आले आहेत. महिला सत्कार समितीचे आभार मानताना त्यांनी चित्रपटातील सर्व कलाकारांचे विशेष कौतुक केले आहे.
यावेळी, “अनेक महिलांनी मिळून माझा सत्कार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे मी अक्षरशः भारावून गेलो आहे. नागपूरकर भगिनींनी हारतुरे देऊन केलेले कौतुक आणि पाठीवर ठेवलेला हात सदैव आठवणीत राहणारा आहे.” असे नागराज मंजुळेंनी म्हटले आहे.
तसेच, “आयुष्यात आतापर्यंत मला अनेक मानसन्मान मिळाले, सत्कारही खूप झालेत. मात्र, नागपूरकर भगिनींनी माझा केलेला हा सत्कार लई भारी आणि मरेपर्यंत आठवणीत राहणारा आहे” असल्याचे मंजुळेंनी सांगितले आहे. पुढे बोलताना त्यांनी झुंडच्या आठवणींना उजाळा देत एक एक किस्से शुंटीगदरम्यानचे सर्वांना सांगितले.
इतकेच नव्हे तर, “नागपूरची ही मुले स्टार आहेत. भविष्यात ही मोठी होऊन शहराचे नाव कमावतील. तसेच जर भविष्यात पुन्हा संधी मिळाली, तर मी नागपुरात पुन्हा शूटिंग करेन.” अशी इच्छा यावेळी नागराज मंजुळेंनी व्यक्त केली. त्यांची ही इच्छा ऐकून सर्वच महिलांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.
दरम्यान नागराज मंजुळेंच्या झुंड चित्रपटाची संपूर्ण शुटींग नागपूरमध्ये करण्यात आली आहे. या चित्रपटात नागराज मंजुळेंनी झोपडपट्टीतल्या मुलांसोबत काम केले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या चित्रपटाचे आणि कलाकारांचे कौतुक करण्यात येत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १.५० कोटींचा गल्ला जमावला आहे. त्यानंतरही चित्रपटाने भरघोस कमाई केल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
आता निळू फुलेंवर येणार बायोपिक, त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याने केली घोषणा
सुपारीचं व्यसन वाईट! जितेंद्र आव्हाडांचं सूचक ट्विट, ‘नाव न घेता’ कोणावर साधला निशाणा?
प्रसाद ओकने निळूभाऊंना दिली गुरूदक्षिणा; मोठी घोषणा करत म्हणाला, तुमचा आशिर्वाद की काय..
… तर भारताची अवस्था श्रीलंकेसारखी होईल, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोदींना दिला धोक्याचा इशारा