‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरु आहे. चित्रपटाला प्रेक्षकांसोबत समीक्षकांकडूनही चांगली प्रतिक्रिया मिळाली आहे. ‘सैराट’सारखा हिट चित्रपट काढणाऱ्या नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा हा पहिलावहिला हिंदी चित्रपट आहे. हिंदी सिनेसृष्टीतील पदार्पणातच त्यांनी महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) या दिग्गज अभिनेत्यासोबत काम केले.
अमिताभ यांच्यानंतर आता नागराज मंजुळे बॉलिवूडमधील आणखी एका सुपरस्टारसोबत काम करू इच्छित आहेत. नुकतीच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना नागराज यांनी त्यांची ही इच्छा व्यक्त केली आहे. तर नागराज मंजुळे काम करू इच्छित असलेला अभिनेता म्हणजे बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan).
मुलाखतीदरम्यान नागराज मंजुळे यांनी म्हटले की, ‘आम्ही आमिर खानसोबत फँड्री हा चित्रपट पाहिला होता. पण जेव्हा त्यांनी सुरुवातीला फँड्री चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती तेव्हा मला विश्वासच बसत नव्हता. त्यांचं मन खूप मोठं आहे कारण ते नव्या दिग्दर्शकांना बोलावतात, त्यांचे चित्रपट पाहतात आणि त्यांचे कौतुक करतात. त्यांचे मत माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे’.
‘झुंड’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच आमिर खानने तो चित्रपट पाहिला होता. आमिर खानसाठी ‘झुंड’चे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. यावेळी चित्रपट पाहून तो खूपच भावूक झाला होता. हा चित्रपट एक प्रेरणादायी चित्रपट असल्याचे त्याने म्हटले होते. तसेच चित्रपट पाहिल्यानंतर यामध्ये काम करणाऱ्या मुलांशीही त्याने संवाद साधत त्यांचे कौतुक केले होते. तसेच सर्वांना त्याच्या घरी येण्याचे प्रेमाचे निमंत्रणही दिले होते.
यासंदर्भात जेव्हा मुलाखतीदरम्यान नागराज मंजुळे यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी म्हटले की, ‘जेव्हाही मी काही नवीन करत असतो तेव्हा सर्वात अगोदर मी आमिर खान यांना फोन लावतो आणि त्यावर चर्चा करतो. ‘झुंड’साठी त्यांनी बराच वेळ दिला. त्यांनी चित्रपट पाहिला आणि तो त्यांना खूपच आवडला. त्यांनी रात्री उशीरापर्यंत या चित्रपटाबाबत आमच्याशी चर्चा केली. तसेच चित्रपटातील मुलांशीही त्यांनी संवाद साधला’.
यावेळी आमिर खानसोबत भविष्यात काम करणार का? असा प्रश्न विचारण्यात आले असता नागराज यांनी म्हटले की, ‘मी दीर्घकाळापासून आमिर खान यांच्यासोबत काम करू इच्छित आहे. यासंदर्भात मी एका प्रोजेक्टचा विचार करत आहेत. ‘फँड्री’ चित्रपटापासूनच या विषयावर मी गांभीर्याने विचार करत आहे. स्वतः आमिर खान यांनाही यासंदर्भात माहिती आहे’.
महत्त्वाच्या बातम्या :
‘तिला किस करताना मी व्हर्जिनिटी गमावली’, बॉलीवूड अभिनेत्रीचा मोठा खुलासा
गिरीजा ओकने सांगितला पहिल्या किसचा अनुभव; म्हणाली, पहिल्या किसवेळी मी…
नागराज मंजुळे रॉक्स! दुसऱ्या दिवशीही ‘झुंड’ने विक्रमी कमाई करत गाठला नवीन टप्पा, कमावले ‘एवढे’ कोटी