नुकताच दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा झुंड चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटातून मंजुळे यांनी हिंदी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. या चित्रपटात जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे.
गेल्या ४ मार्चला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कमाईची सुरुवात संथगतीने झाली होती. मात्र आता या चित्रपटाच्या कमाईत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. झुंड’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाची कथा अनेक प्रेक्षकांना आवडली आहे. याचबरोबर या चित्रपटाचे अनेक चित्रपट समीक्षक आणि कलाकार कौतुक करताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच मंजुळे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान काही किस्से सांगितले आहे. यावेळी त्यांनी या चित्रपटातील कलाकारांची कास्टिंग कशी झाली? याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. खास करून मंजुळे यांनी ‘भावना भाभी’ या पात्राबद्दल मोठा किस्सा सांगितला आहे.
भावना भाभी हे पात्र झुंड’ या बहुचर्चित चित्रपटात सायली पाटील हिने साकारले आहे. याबाबत सांगताना मंजुळे म्हणतात, “सायली ही सैराटच्या ऑडिशनसाठी आली होती. त्यावेळी तिनं चांगल काम केलं होतं. पण तिची निवड झाली नाही.” असा खुलासा मंजुळे यांनी केला.
तसेच पुढे बोलताना मंजुळे यांनी सांगितले, “सायली ही चांगली कलाकार आहे. ज्यावेळी मी या चित्रपटातील भावना ही भूमिका लिहित होतो, त्यावेळी मला सायली ही भूमिका चांगल्याप्रकारे करेल असे वाटले होते. त्यानंतर मी सायलीला फोन केला. त्यावेळी तिला चित्रपटाबद्दल सांगितले असल्याचे त्यांनी म्हंटले.
दरम्यान, याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सायलीने देखील भाष्य केले आहे. ती म्हणतीये, ‘“सैराटसाठी ऑडिशन दिली होती. पण तेव्हा माझी निवड झाली नव्हती. त्यानंतर अचानक एक दिवशी मला झुंडसाठी मंजुळे यांचा फोन आला. यावर मला विश्वासच बसत नव्हता.”
महत्त्वाच्या बातम्या
ट्विट करायला कोणी पैसै दिले होते का? विवेक अग्निहोत्रींवर ट्विट करणे कुणाल कामराला पडले महागात, युजर्स संतापले
भगवंत मानचा यांचा आमदारांना दणका! पेंशनबाबत घेतला मोठा निर्णय; वाचून तुम्हीही कौतूक करा
विरोधकांना झाप झाप झापणारे राऊत अखेर नमले; ‘त्या’ विधानावरून मागितली जाहीर माफी, म्हणाले…
प्रकाश आंबेडकरांनी निवडणुकीत एक हजार कोटी घेतले; शिवसेना आमदाराचा खळबळजनक आरोप