नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वी आणि प्रदर्शनानंतरही फार चर्चा झाली. या चित्रपटाचे अनेक कलाकार, दिग्दर्शक, समीक्षक आणि प्रेक्षकांकडून कौतुक मिळाले. तर दुसरीकडे चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना मात्र सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. यादरम्यान नुकतीच एका मुलाखतीत बोलताना नागराज मंजुळे यांनी या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.
नागराज मंजुळे यांनी नुकतीच एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या मुलाखतीवेळी नागराज मंजुळे यांनी चित्रपटादरम्यानचे अनेक अनुभव आणि किस्से सांगितले. तसेच यावेळी चित्रपटातील अनेक कलाकारांनाही चित्रपटासंबंधित त्यांचा अनुभव शेअर केला.
यावेळी बोलताना नागराज यांनी सोशल मीडियावर जातीवरून होणाऱ्या टीकेवर उत्तर दिले. मुलाखतीत बोलताना त्यांनी ‘मी कोणत्याही जातीला मानत नाही. त्यामुळे मलाही कोणत्याही जातीच्या बेडीत अडकवू नका, असे आवाहन केले आहे.
नागराज यांनी म्हटले की, ‘माझ्या जवळ सगळ्या जातीची माणसे आहेत. मी स्वतःला कोणत्या जातीचा मानत नाही. त्यामुळे मला कोणी कोणत्याही जातीचा मानू नये. सोशल मीडियावरच्या कमेंट्स मी वाचत नाही. माझ्या घरात सगळ्या जातीचे लोक राहतात. मी जातीयवादी आहे, असं मला कोणी म्हटलं तर मी ते गांभीर्याने घेत नाही’.
नागराज यांनी पुढे म्हटले की, ‘माझ्यात काही विकार असतील, मी काही चुकीचे करत असेन तर ते मला सांगितल्यास मी ते स्वीकार करेन. माझ्यातील चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन. पण जातीवरून टीका करणे चुकीचे आहे’.
‘मला जे काही सांगायचे असेल ते मला समोर येऊन सांगा. फेसबुकवर नको. लोक घरी बसून काहीही लिहितात. पण मी कोणत्या जातीच्या विरोधात नाही. मी माझ्या जातीच्या देखील विरोधात आहे. आणि जे जात-धर्म पाळतात त्यांच्याविरोधात मी आहे’, असे त्यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान, ‘झुंड’ हा चित्रपट नागपूरमधील निवृत्त क्रीडा प्रशिक्षक विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. विजय बरसे यांनी झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण देऊन त्यांना खेळाडू बनवले होते. तर चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी विजय बरसे यांची भूमिका साकारली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
जातीयवादी म्हणत ट्रोल करणाऱ्यांना नागराजने दिलं सर्वांची मनं जिंकणारं उत्तर; वाचून तुम्हीही कौतूक कराल
“द काश्मिर फाईल्स’ पाहून ढसाढसा रडली महिला, थेट पकडले दिग्दर्शकाचे पाय; म्हणाली…
‘द कपिल शर्मा शो’मध्ये प्रमोशनसाठी विवेक अग्निहोत्रींकडे मागितले ‘एवढे’ रूपये, प्रसिद्ध अभिनेत्याचा खळबळजनक खुलासा