छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय अखेर विवाहबंधनात अडकली आहे. मागील अनेक दिवसांपासून तिच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. तर आज मौनी तिचा प्रियकर सूरज नांबियारसोबत लग्नगाठ बांधली (Mouni Roy Married With Suraj Nambiyar) आहे. मौनी आणि सूरजच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
मौनी रॉयचा मित्र अर्जून बिजलानीने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर त्यांच्या लग्नाचा पहिला फोटो शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, मौनी आणि सूरज दाक्षिणात्य वधूवराच्या रूपात दिसत आहेत. सूरजने लग्नासाठी गोल्डन कुर्ता आणि पांढरी लुंगी नेसली आहे. तर मौनीने पांढऱ्या रंगाच्या शुभ्र साडीला लाल आणि गोल्डन रंगाची बॉर्डर असलेली साडी नेसली आहे.
त्यावर मौनीने माथ्यावर बिंदी, कानात झुमके गळ्यात गोल्डन टेम्पल ज्वेलरी, कंबरपट्टा, हातात बांगड्या असे दागिने घातले आहेत. तसेच तिने केसात गजराही माळला आहे. दाक्षिणात्य पेहराव त्यावर साजेसे दागिने आणि हलकासा मेकअप अशा लूकमध्ये मौनीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
मौनी रॉयनेही तिच्या लग्नातील काही फोटो इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. यामध्ये एका फोटोत सूरज मौनीच्या भागांत सिंदूर भरताना दिसत आहे तर दुसऱ्या फोटोत सूरज मौनीला मंगळसूत्र बांधताना दिसत आहे. तिसऱ्या फोटोत मौनी सूरजला वरमाला घातलाना दिसून येत आहे. दोघेही लग्नावेळी खूपच खूश असल्याचे या फोटोंमध्ये दिसून येत आहे.
फोटो शेअर करत मौनीने लिहिले की, मला तो शेवटी सापडला. हातात हात घालून, कुटुंब आणि मित्रांच्या आशीर्वादाने आम्ही लग्न केलं. तुम्हा सर्वांच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे. यापुढे मौनीने २७-१-२२ हे तिच्या लग्नाची तारीखही लिहिली आहे. मौनीच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत तिला शुभेच्छा देत आहेत.
तसेच सूरज-मौनीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून मौनीच्या फॅनपेजवरही हे फोटो मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहेत. व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओत मौनी पती सूरज नांबियारला मिठी मारताना दिसत आहे. दोघांचा हा अंदाज पाहून आजबाजूला उपस्थित सर्व लोकांनी टाळ्याही वाजवल्या.
मौनी आणि सूरजने गोव्यात दाक्षिणात्य परंपरेनुसार लग्न केले आहे. सूरज नांबियार दक्षिणेकडील असल्याने त्यांच्या संस्कृतीचा मान ठेवत त्या दोघांनी मल्याळम पद्धतीनुसार लग्न केले. त्यांच्या लग्नात कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र-मंडळी उपस्थित होते. यामध्ये मंदिरा बेदी, अर्जून बिजलानी, मीट ब्रदर्स यांसह इतर कलाकार सहभागी होते.
दरम्यान, मौनी आणि सूरज यांची पहिली भेट २०१९ मध्ये दुबईत झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मौनी आणि सूरजने त्यांचे नाते सर्वांपासून लपवून ठेवले होते. तर आता ते दोघे आयुष्यभरासाठी एकमेकांचे साथी झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
पुष्पा स्टाईलने ड्रग्सची तस्करी करणाऱ्या गँगचा मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश, २८ लाखांचा गांजा केला जप्त
साऊथ मेगास्टार चिरंजीवी यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती
मुलीच्या वाढदिवसादिवशीच आईने तडफडत सोडले प्राण, कारण वाचून डोळे पाणावतील