साऊथचा सुपरस्टार नागार्जुनने आपल्या दमदार अभिनयाने चित्रपट सृष्टीत स्थान मिळवले. त्याच्या अभिनयाचे चाहते दिवाणे आहेत. नागार्जुनचे अनेक चित्रपट हे सुपरहिट ठरले आहेत. त्याचबरोबर अनेक चित्रपटातून त्याने चाहत्यांना प्रेरणा देखील दिली आहे.
मात्र आता नागार्जुन हा एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. नागार्जुनने मुख्यमंत्री श्री के चंद्रशेखर राव यांच्या वाढदिवसानिमित्त १०८० एकर वनभूमी दत्तक घेतल्याची घोषणा केली आहे. त्याला ही प्रेरणा ग्रीन इंडिया चॅलेंजपासून मिळाली. या जागेवर फॉरेस्ट पार्क तयार होणार आहे. या पार्कला अक्किनेनी नागेश्वर राव अर्बन फॉरेस्ट पार्क असे नाव देण्यात येणार आहे.
तसेच तयार होणाऱ्या पार्कचे हे नाव नागार्जुनच्या वडिलांचे आहे. त्याचबरोबर चेंगीचेर्ला वनक्षेत्रात नागरी वन उद्यान तयार करण्यात येणार असल्याचे नागार्जुन यांने स्पष्ट केले. या पार्कच्या भूमीचं पायापूजन देखील झाले आहे. त्यावेळी अनेक मंडळी उपस्थित होते. या दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या पायापूजन कार्य़क्रमाला खासदार जे संतोष कुमार हे त्यांच्या कुटुंबियासोबत उपस्थित होते. तसेच नागार्जुनचे सहकुटुंब यावेळी उपस्थित होते. अक्किनेनी नागार्जुन, अमला, मुलगा नागा चैतन्य आणि निखिल. तसेच इतर कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते. तसेच या वनभूमीच्या विकासाची कामे करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कल्पनेनुसार २ कोटी रूपये देण्यात आले आहेत.
Many happy returns of the day to chief minister Kcr garu!
Happy to announce the adoption and laying the foundation for the ANR URBAN PARK in chengicherla forest area by the Akkineni family
🙏 to #kcr garu and @MPsantoshtrs for this opportunity #greenindiachallenge #HBDKCR pic.twitter.com/HcGZIiKm5k
— Nagarjuna Akkineni (@iamnagarjuna) February 17, 2022
त्याचबरोबर या पायापूजन दरम्यान नागार्जुनने आपले मत देखील व्यक्त केले. तो म्हणाला की, “सध्या आपल्याला आपला निसर्ग जापायचा आहे. त्यामुळे मी त्याबाबत खूप महत्वाची आहे. नुकताच देशात पर्यावरणास अनुकूल आणि आपले पर्यावरण स्वच्छ करण्यासाठी ग्रीन इंडिया चॅलेंज कार्यक्रम सुरू केला आहे. तसेच या कार्यक्रमाच्या अनुशंगाने अनेक झाडांची रोपे लावण्यात येणार आहेत.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “काही दिवसांपूर्वीच झालेल्या एका कार्यक्रमात खासदार संतोष कुमार यांच्याशी वनभूमी दत्तक घेण्याविषयी बोलणे झाले होते. त्यानंतर आम्ही अनेकदा याविषयावर सविस्तर भेटून चर्चा देखील केली आहे. तसेच एकदा मी एका कार्यक्रमात वनभूमी खरेदी करणार असल्याचे देखील जाहीर सांगितलं होतं. त्यामुळे मला ही संधी सरकारने दिली असल्याने मी त्यांचा ऋणी आहे.”
नागार्जुन पुढे म्हणाला की, “या वनक्षेत्रामुळे परिसरात राहणाऱ्या अनेक लोकांना त्याचा फायदा होईल. त्यामुळे मी वडिलांना दिलेले वचन देखील पुर्ण झाले.” त्याचबरोबर हा पायापूजनचे काही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे नागार्जुनला त्याच्या चाहत्यांनी या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहे. तसेच खासदार संतोष कुमार यांनी नागार्जुनचे कौतुक देखील केले आहे.
ते म्हणाले की, “दत्तक घेतलेल्या जागेत झाडे लावण्यात येणार असून आजपासून त्या कार्यक्रमाला सुरूवात झाली. तसेच इतकी मोठी जमीन घेतल्याने ती अधिक सुरक्षित सुध्दा राहिल.” नागार्जुनच्या या कार्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.