Share

सामंथाला घटस्फोट दिल्यानंतर नागा चैतन्य पुन्हा करतोय लग्न? सोशल मिडीयावर चर्चांना उधाण

समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांची जोडी साउथ इंडस्ट्रीमध्ये टॉपवर होती. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर 2017 मध्ये  दोघांनी लग्न केले, मात्र इंडस्ट्रीतील एवढ्या लाडक्या जोडप्याचे इतकं अचानक ब्रेकअप होऊ शकतं याची कुणी कल्पनाही केली नसेल. बरं, विभक्त झाल्यानंतर, दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत आणि त्यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत.(Naga Chaitanya remarries after divorcing Samantha)

अशा परिस्थितीत नागा चैतन्यबाबत एक बातमी समोर येत आहे, जी धक्कादायक आहे. ही बातमी ऐकून कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. असे सांगितले जात आहे की नागा चैतन्य आणि समंथा यांनी घटस्फोट घेऊन एक वर्ष पूर्ण व्हायला आले आहे आणि आता चैतन्यने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

समोर येत असलेल्या बातम्यांनुसार, लवकरच आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या नागा चैतन्यने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याबाबत अभिनेता किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर, यावेळी देखील अभिनेता अभिनेत्रीसोबत लग्न करणार की अन्य कोणाशी हे देखील स्पष्ट झालेले नाही.

https://www.instagram.com/p/BvV6jfaB43y/?utm_source=ig_web_copy_link

आता तो कोणत्याही अभिनेत्रीसोबत लग्न करू इच्छित नाही, असे सांगितले जात आहे. त्यामुळे तो इंडस्ट्रीबाहेरील कोणाशी तरी लग्न करण्याच्या तयारीत आहे. सामंथा रुथ प्रभूपासून घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्य खूपच तुटल्याचेही सांगितले जात आहे. या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांनाही उत्सुकता आहे.

याशिवाय अभिनेत्याच्या डेटींगबद्दल बोलायचे झाले तर, समंथापूर्वी नागाचे नाव श्रुती हासनसोबतही जोडले गेले आहे. बातम्यांनुसार, नागाला श्रुतीसोबत लग्न करायचे होते, पण तसे होऊ शकले नाही. काही कारणांमुळे दोघांचे ब्रेकअप झाले. यानंतर काही वेळातच समांथाने त्यांच्या आयुष्यात प्रवेश केला आणि दोघांनी 2017 मध्ये एकमेकांशी लग्न केले.

महत्वाच्या बातम्या-
माजी पती नागचैतन्याचे तीन टॅटू शरीरावर गोंदवल्याने समंथाला होतोय पश्चाताप? म्हणाली, कधीच..
कोट्यवधींची मालकीन असणाऱ्या समंथाकडे एकेकाळी शिक्षणासाठी नव्हते पैसे; हे काम करून झाली टॉलिवूडची स्टार
एकेकाळी शिक्षण घ्यायलाही नव्हते पैसे, आता आहे साऊथमधील महागडी अभिनेत्री; वाचा समंथाचा प्रवास
धक्कादायक! समंथा-अल्लू अर्जूनला आपल्या इशाऱ्यावर नाचवणाऱ्या गणेश आचार्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल

 

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now